Join us

सुंदर मी होणार! बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी केलीये प्लास्टिक सर्जरी; एकीने तर केल्या १३ सर्जरीज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 4:20 PM

1 / 7
अनुष्का शर्मा- बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये अनुष्काचं नाव आवर्जुन घेतलं जातं. उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे चर्चेत येणाऱ्या अनुष्काने प्लास्टिक सर्जरी केली आहे. २०१४ मध्ये तिने लीप फिलिंग करुन घेतलं. परंतु, तिच्या नव्या लूकची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. नेटकऱ्यांनी तिची तुलना डोनाल्ड डक या कार्टून पात्राशी केली होती. त्यानंतर तिने लीप करेक्शन केलं.
2 / 7
नोरा फतेही - स्ट्रीट डान्सर, बाहुबली या सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री, डान्सर नोरा फतेही हीने प्लास्टिक सर्जरी केली आहे. नोराने हिप्स आणि ब्रेस्ट सर्जरी केल्याचं सांगण्यात येतं. सध्या ती इंडियाज बेस्ट डान्सर या रिऍलिटी शोच्या परिक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहे.
3 / 7
श्रुती हासन - दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हासन हिने तब्बल १३ वेळा प्लास्टिक सर्जरी केली आहे. तिने ओठ मोठे करण्या करता लीप फिलिंग करुन घेतलं होतं. तसंच प्लास्टिक सर्जरी केल्याचं मान्य करण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही असंही तिने सांगितलं.
4 / 7
प्रियांका चोप्रा देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल प्रियांका चोप्राने ओठ आणि नाक यांच्यात बदल करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे.
5 / 7
वाणी कपूर - ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या वाणी कपूरने ओठांवर शस्त्रक्रिया केली आहे. ज्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आलं.
6 / 7
आयेशा टाकिया - वॉंडेड या सिनेमामुळे चर्चेत आलेल्या आयेशा टाकियाने प्लास्टिक सर्जरी केली आहे. मात्र, तिची सर्जरी अयशस्वी ठरली ज्यामुळे तिला मोठ्या प्रमाणवर ट्रोल करण्यात आलं.
7 / 7
राखी सावंत- राखी सावंतने नाक,ओठ आणि स्तन यांच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. विशेष म्हणजे सततच्या शस्त्रक्रियांमुळे तिला लठ्ठपणासारख्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याचं सांगण्यात येतं.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाअनुष्का शर्माप्रियंका चोप्राराखी सावंत