Join us

श्रीदेवीसारखंच क्रॅश डाएटवर होत्या 'या' अभिनेत्री, शूटच्या वेळीच पडायच्या बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 4:34 PM

1 / 10
भारतीय सिनेमातील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचा मृत्यू नक्की कसा झाला होता. दुबईत त्या रात्री नक्की काय घडलं होतं याचा खुलासा नुकताच पती बोनी कपूर यांनी नुकताच मुलाखतीत केला.
2 / 10
चिरतरुण दिसण्याच्या नादात श्रीदेवी यांना जीव गमवावा लागला. बोनी कपूर म्हणाले,' श्री स्ट्रिक्ट डाएटवर होती. ती डाएट म्हणून खूप वेळ उपाशी राहायची. जेवणात मीठाचा समावेश करायची नाही. त्यामुळे अनेकदा तिला चक्कर यायची. डोळ्यासमोर अंधार यायचा. स्क्रिनवर छान दिसावं यासाठी ती हे सगळं करायची.'
3 / 10
२०१८ मध्ये श्रीदेवी शेवटच्या विमानतळावर दिसल्या होत्या. 'लेडी सुपरस्टार' म्हणून त्यांना संबोधलं जायचं. याही वयात त्या इतक्या कशा सुंदर दिसतात अशाच प्रतिक्रिया तेव्हा अनेकांनी दिल्या असतील. मात्र यामागे त्यांनी शरिराचे केलेले हाल हेच कारण होतं.
4 / 10
बोनी कपूर यांचा हा खुलासा शोबिजच्या मागील सत्यता दाखवणारा आहे. स्क्रीनवर चांगलं दिसायचं म्हणून अनेकदा मॉडेल्स, अभिनेत्री क्रॅश डाएट करतात. यामुळे जे नुकसान झालंय धक्कादायक आहे.
5 / 10
इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या कपूर कुटुंबातील सर्वात धाकटी मुलगी बेबो म्हणजेच करीना कपूर (Kareena Kapoor). तिनेही 'टशन' सिनेमासाठी साइज झिरो फिगर केली होती. सिनेमातील 'छलिया' या गाण्यातील तिची फिगर पाहून सगळेच अवाक झाले होते.
6 / 10
मात्र कडक डाएट प्लॅनमुळे ती सेटवरच बेशुद्ध झाली होती. बिकीनी सीन शूटआधी तिने खाणं सोडलं होतं. ती केवळ ऑरेंज ज्यूसवर राहत होती.
7 / 10
टीव्ही अभिनेत्री निया शर्मालाही (Nia Sharma) स्लीम फिगरच्या नादात नुकसानाला सामोरं जावं लागलं होतं. 'फूँक ले' गाण्यासाठी तिने केवळ डाएट केलं नाही तर अन्नच सोडलं होतं. रिकाम्या पोटीच ती वर्कआऊट करायची आणि ३ तास रिहर्सल करायची.
8 / 10
क्रॅश डाएटमुळे ती अनेकदा बेशुद्ध पडली. पण तिने ते सगळं सहन करत गाणं पूर्ण केलंच. गाणं नीट होईल की नाही या चिंतेत तिला नर्व्हस ब्रेकडाऊन व्हायचं आणि ती दिवस रात्र रडायची.
9 / 10
अभिनेत्री कतरिना कैफचं (Katrina Kaif)'शीला की जवानी' हे गाणं आठवत असेलच. हे तिच्या करिअरमधलं सर्वात हिट गाणं ठरलं. यामध्ये तिची सुपर टोन्ड बॉडी आणि बेली डान्स पाहून सर्वच चकित झाले. कतरिनाने अशा फिगरसाठी ६ महिने मेहनत घेतली होती.
10 / 10
या गाण्यासाठी कतरिना दिवसभर शूट केल्यानंतर रात्री वेगळं वर्कआऊट करायची. तिने साखर आणि मीठ पूर्णपणे बंद केलं होतं. शूटच्या वेळी तर ती पाणीही प्यायची नाही. यामुळे ती शूटच्या वेळी सीन्स करतानाच बेशुद्ध पडली होती.
टॅग्स :श्रीदेवीकरिना कपूरकतरिना कैफनिया शर्मा