Join us

या कारणांसाठी बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी लपवलं आपलं लग्न !!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 2:43 PM

1 / 8
बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स पर्सनल लाईफबद्दल बोलायचे टाळतात. अगदी लग्नही लपवतात. लग्न लपवणाºया अनेक नट्या येथे आहेत. अर्थात ही लग्न लपवण्यामागची कारणे वेगवेगळी आहेत.
2 / 8
श्रीदेवी - श्रीदेवीने बोनी कपूर यांच्याशी लग्नगाठ बांधली. पण अनेक दिवस या लग्नाची बातमी दोघांनी जगापासून लपवून ठेवली होती. करिअरमुळे नाही तर बोनी कपूर आधीच विवाहित होते. पत्नीला घटस्फोट न देताच त्यांनी श्रीदेवींशी लग्न केले होते म्हणून. श्रीदेवी लग्नाआधी पे्रग्नंट होत्या. बेबी बम्प दिसू लागल्यावर श्रीदेवी व बोनी कपूर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
3 / 8
जुही चावला - जुही चावलाने लग्न केले तेव्हा ती करिअरच्या शिखरार होती. पण जुहीने लग्न केले, हे कुणाच्या गावीही नव्हते. बिझनेसमॅन जय मेहतांसोबत लग्न केल्यानंतर बºयाच दिवसांनी या लग्नाची बातमी समोर आली होती. जय मेहतांची पहिली पत्नी वारली, यानंतर जुही चावलाची आई व पाठोपाठ भावाचे निधन झाले. या कारणामुळे हे लग्न अगदी साधेपणाने पार पडले होते. जुही प्रेग्नंट झाल्यानंतर तिने लग्नाचा खुलासा केला होता.
4 / 8
माधुरी दीक्षित- करिअरच्या शिखरावर असताना माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेनेंसोबत लग्न केले. अमेरिकेत हे सीके्रट मॅरेज झाले होते. काही दिवस माधुरीने लग्नाची बातमी लपवली होती. पण यानंतर मुंबईत लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन देऊन तिने या बातमीचा खुलासा केला होता.
5 / 8
राधिका आपटे - अभिनेत्री राधिका आपटे हिने बरेच दिवस लग्नाची बातमी दडवून ठेवली होती. याचे कारण होते करिअर. 2012 मध्ये तिने विदेशी म्युझिशियन बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले.
6 / 8
अदिती राव हैदरी - बॉलिवूडमध्ये येण्याआधीच अदितीचे सत्यदीप मिश्रासोबत लग्न झाले होते. पण बॉलिवूड पदार्पण करताना तिने हे गोष्ट लपवून ठेवली होती. आता मात्र अदिती व सत्यदीप यांचा घटस्फोट झालाय.
7 / 8
सुरवीन चावला - सुरवीन चावलाने 2015 म्ये अक्षय ठक्करसोबत लग्नगाठ बांधली. पण अनेक वर्षे तिने हे लग्न लपवून ठेवले. अनेक वर्षांनंतर अचानक दोघांचे सुंदर फोटो शेअर करत तिने लग्नाची बातमी जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
8 / 8
माही गिल - अभिनेत्री माही गिलचे लग्न वयाच्या 17 व्या वर्षीच झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर अनेक वर्षांनी एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला होता. सध्या माही लिव्ह इनमध्ये आहे. तिला एक मुलगी आहे.
टॅग्स :श्रीदेवीबॉलिवूड