Join us

शाहरुखपासून सलमानपर्यंत! लोकांच्या लग्नात डान्स करण्यासाठी 'हे' सेलिब्रिटी किती मानधन घेतात माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 5:00 PM

1 / 6
बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. यात अनेकदा या कलाकारांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि ग्लॅमरस जीवनाविषयी प्रेक्षकांना कमालीचं आकर्षण असतं. त्यातच या कलाकारांचं मानधन किती, त्यांची एकूण संपत्ती किती हे जाणून घ्यायला तर अनेक चाहते उत्सुक असतात. त्यामुळेच लग्नसमारंभात डान्स करण्यासाठी हे बॉलिवूड कलाकार किती मानधन घेतात ते पाहुयात.
2 / 6
सलमान खान- दबंग खान, भाईजान अशा कितीतरी नावाने ओळखला जाणारा सलमान खान याचा चाहतावर्ग तुफान आहे. त्यामुळे त्याची एक झलक दिसावी यासाठी अनेक जण कसोशीने प्रयत्न करत असतात. कोट्यवधींचा मालक असलेला सलमान खान लग्नामध्ये परफॉर्म करण्यासाठी साधारणपणे २ कोटी रुपये मानधन घेतो.
3 / 6
शाहरुख खान- बॉलिवूडचा किंग खानदेखील अनेक बड्या कलाकार, राजकीय व्यक्ती वा अन्य सेलेब्सच्या लग्नात डान्स परफॉर्म करतो. मात्र, यासाठी तो ३ कोटी रुपये घेतो. याविषयी बॉलिवूड लाइफच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे.
4 / 6
कतरिना कैफ - बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने अलिकडेच विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली आहे. कतरिनादेखील अनेक लग्न समारंभामध्ये डान्स परफॉर्म करते. यासाठी ती ३.५ कोटी रुपये मानधन घेते.
5 / 6
अक्षय कुमार- खिलाडी कुमार लग्नात किंवा अन्य इव्हेंटमध्ये डान्स करण्यासाठी साधारणपणे अडीच कोटी रुपये घेतो.
6 / 6
अभिनेत्री प्रियंका चोप्रा - देसी गर्ल प्रियांका चोप्रा आज हॉलिवूडमध्येदेखील नशीब आजमावत आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता आता सातासमुद्रापारपर्यंत पोहोचली आहे. प्रियांका एका डान्स परफॉर्मसाठी २.५ कोटी रुपये घेते.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसलमान खानशाहरुख खानकतरिना कैफप्रियंका चोप्रा