Join us

बी-टाऊनमधील बापलेकीच्या जोड्या पाहा! राजकुमारीपेक्षा कमी नाही या स्टारकिड्सचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 2:36 PM

1 / 7
सैफ अली खानला पहिली पत्नी अमृता सिंहपासून मुलगी आहे जी आज आघाडीची अभिनेत्री आहे. सारा अली खान. सैफ आणि सारा ही बापलेकीची जोडीही अगदी हिट आहे. त्यांचे फॅमिली फोटो नेहमी सोशल मीडियावर फादर-डॉटर गोल्स देत असतात.
2 / 7
बॉलिवूडचा खलनायक शक्ती कपूर यांची लेक श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सर्वात क्युट आणि चुलबुली अभिनेत्री आहे. वडिलांसोबत काही ना काही कॉमेडी नखरे करत ती सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत असते. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
3 / 7
भट कुटुंबाची लाडकी आलिया भट आणि वडील महेश भट ही पण एक प्रसिद्ध बापलेकीची जोडी आहे. आलियाचा वडिलांसोबत खास बाँड आहे. वडिलांची मदत न घेता तिने सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. आज तिने वडिलांच्या आशिर्वादाने अमाप यश मिळवलं आहे.
4 / 7
झकास अभिनेते अनिल कपूर आणि लेक सोनम कपूर हे त्यातलंच एक उदाहरण. अनिल कपूर बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते आहेत. त्यांची एनर्जी, उत्साह याला तर कोणीच टक्कर देऊ शकत नाही. त्यांची लाडकी लेक सोनम कपूरही अभिनेत्री आहे. मात्र ती वडिलांपेक्षा खूपच वेगळी आहे. दोघंही वेगळे असूनही एकमेकांच्या खूप जवळ आहेत. सोनमच्या लग्नात अनिल कपूर खूप भावूक झाले होते. त्यानंतर ती पती आनंद आहुजासोबत लंडनला असतानाही त्यांच्या भावना दाटून आल्या होत्या. नुकतेच ते आजोबा झाले आहेत.
5 / 7
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी मुलगी जान्हवी कपूर आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक मुलाखतींमधून जान्हवी आणि बोनी कपूर यांच्यातील क्युट बाँड सर्वांसमोर आला आहे. नुकतंच ती वडिलांच्या निर्मितीखाली बनलेल्या 'मिली' सिनेमात दिसली. यातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.
6 / 7
सुहाना खान या शाहरुखची लाडलीची सध्या बीटाऊनमध्ये खूपच चर्चा आहे. किंग खानने आपल्या प्रिन्सेसला खूपच रॉयल अंदाजात वाढवलं आहे. त्यांच्या फादर डॉटरची बाँडची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.
7 / 7
'आखरी पास्ता' या कॅरेक्टरमुळे लोकप्रिय झालेले चंकी पांडेंची लेक अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये वेगळी जागा तयार केली आहे. चंकी आणि अनन्या दोघंही बापलेकीपेक्षा एकमेकांचे मित्र आहेत.
टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानचंकी पांडेअनन्या पांडेआलिया भट