Join us

Birthday Special: लहानपणी धुतले चहाचे कप; मेहनतीच्या जोरावर OM Puri यांनी गाठला Hollywood पर्यंतचा पल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 1:43 PM

1 / 9
संघर्ष आणि अफाट मेहनतीच्या जोरावर आपल्याला सिद्ध केलेल्या लोकांच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. ओम पुरी हेदेखील असे अभिनेते होतो, ज्यांचा प्रवास हा अतिशय संघर्षमय होता. लहानपणी त्यांना परिस्थितीमुळे चहाचे कप धुण्याचंही काम करावं लागलं होतं.
2 / 9
आज देशातील, जगातील मनोरंजन क्षेत्रातील अशी कोणतीही व्यक्ती नसेल ज्यांनी त्यांचं टॅलेंट पाहिलं नाही. ओम पुरी यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी झाला. या निमित्तानं जाणून घेऊया त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता आणि त्यांनी चित्रपट सृष्टीत कशाप्रकारे आपलं स्थान निर्माण केलं होतं.
3 / 9
ओम पुरी यांचा सुरूवातीचं जिवन अतिशय संघर्षमय होतं. अनेकदा ते आपल्या जीवनातील काही क्षण सांगताना भावूक होत असत. एकदा त्यांनी अनुपम खेर यांच्या शोमध्ये आपल्या जिवनातील संघर्षमय प्रवास सांगितला होता.
4 / 9
ते ६ वर्षांचे असताना आपलं जिवन चालवण्यासाठी त्यांना एका ठिकाणी चहाचे कप धुण्याचं काम करावं लागलं होतं. त्यांचं बालबण हे अतिशय गरीबीत गेलं होतं. अनेक संघर्ष केल्यानंतर त्यांना मोठं यश मिळाल्याचं त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
5 / 9
तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ओम पुरी यांचं इंग्रजी चांगलं नव्हतं. त्यांचं हिंदीही तितकं चांगलं नव्हतं. त्यांचं शिक्षण हे पंजाबी भाषेतून झालं होतं.
6 / 9
जेव्हा ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आले तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासही कमी होता. याच कारणामुळे एकदा अशी वेळ आली की त्यांनी अभिनय क्षेत्रात पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या नशीबात काही आणखीच लिहिलं होतं.
7 / 9
ओम पुरी हे आपल्या टॅलेंटच्या जोरावर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पोहोचले होते. परंतु या ठिकाणीही गरीबीनं त्यांची पाठ सोडली नाही. त्या दिवसांमध्ये नसीरुद्दीन शाह यांची त्यांना साथ लाभली. त्यावेळी नसीरुद्दीन शाह नसते तर आज आपण या ठिकाणी पोहोचलो नसतो, असं अनेकदा ओम पुरी यांनी सांगितलं होतं.
8 / 9
आपल्या चेहऱ्यामुळेही ओम पुरी यांना खुप गोष्टी सहन कराव्या लागल्या. जेव्हा ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पोहोचले तेव्हा त्यांची ओळख शबाना आझमी यांच्याशी झाली. त्यावेळी शबाना आझमी यांनी कशी लोकं अभिनेते बनण्यासाठी येतात असं म्हटलं होतं. अनेकदा आपल्याला चेहऱ्यामुळे टीका ऐकवी लागल्याचं त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
9 / 9
ओम पुरी यांचं चित्रपट सृष्टीतील करिअर फार मोठं होतं. त्यांनी ३१९ छोट्या मोठ्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. यात अनेक भाषांमधील चित्रपटांचाही समावेश होता. भारताकडून सर्वाधित हॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक आहेत.
टॅग्स :ओम पुरीबॉलिवूडहॉलिवूड