सनी देओल ते काजोल! ब्रँडेड नव्हे तर लोकल बाजारात शॉपिंग करतात 'हे' सेलिब्रिटी By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 2:54 PM1 / 8सनी देओल - आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा सनी देओल आजही साध्या पद्धतीने जीवन जगण्याला पसंती देतो. कोणत्याही महागड्या कपड्यांच्या दुकानात जाण्यापेक्षा तो लोकल मार्केटमध्ये जाऊन खरेदी करतो.2 / 8 इमरान हाश्मी- इमरान हाश्मी हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन आहे. सिरिअल किसर या नावाने ओळखला जाणार इमरानदेखील सामान्यांप्रमाणे लोकल मार्केटमध्येच खरेदी करतो. 3 / 8राजकुमार राव - साधी राहणी उच्च विचारसरणी हे सूत्र राजकुमार राव पाळतो. त्यामुळे तो कपड्यांवर फारसे पैसे खर्च करत नाही,4 / 8नवाजुद्दीन सिद्दीकी - आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी कायम सामान्य व्यक्तींप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तोदेखील साध्या मार्केटमधूनच कपडे वा अन्य वस्तूंची खरेदी करतो.5 / 8सारा अली खान - सारा अली खान सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. परंतु, आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी सारा महागड्या कपड्यांसोबतच लोकल मार्केटमधूनही खरेदी करते. एकदा तिला आणि अमृता सिंगला हैदराबादमधील एका लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करताना स्पॉट करण्यात आलं होतं.6 / 8सुशांत सिंह राजपूत - दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यातील साधेपणा सगळ्यांनाच ठावूक होता. सुशांतदेखील कोटयवधींचा मालक असूनही लोकल मार्केटमधूनच खरेदी करायचा. त्याचेही अनेक फोटो एकेकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.7 / 8अक्षय कुमार - खिलाडी कुमार या नावाने परिचित असलेला अक्षय कुमार जीवनात अनेक गोष्टी, नियमांचं पालन करतो. तो आजही कोणत्या पार्टीमध्ये जात नाही. इतकंच नाही तर अमाप संपत्ती असूनही तो लोकल मार्केटमध्येच खरेदीसाठी पहिली पसंती देतो.8 / 8काजोल - लोकप्रिय अभिनेत्री आणि अजय देवगणची पत्नी काजोलदेखील लोकल मार्केटमधूनच खरेदी करते. अनेकदा तिला शॉपिंग करताना स्पॉटही करण्यात आलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications