Bollywood : कधी शाळेतच गेली नाही कतरिना; बॉलिवुड कलाकार अभ्यासात मात्र गार ! By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 1:40 PM1 / 8शाहरुख खानसोबत ओम शांती ओम सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आज ग्लोबल स्टार आहे. जगभरात तिचे चाहते आहेत. आधी मॉडेलिंग आणि नंतर अभिनय क्षेत्रात तिने पदार्पण केले. दीपिकाने बंगळुरुच्या सोफिया हायस्कुल मधून शिक्षण घेतले आहे. यानंतर माऊंट कार्मल कॉलेज मधून इंटरडिएट केले आहे.दीपिका कॉलेज ड्रॉपआऊट आहे. करिअरच्या सुरुवातीलाच तिला मॉडेलिंगची ऑफर यायला लागल्याने तीने शिक्षण अर्धवट सोडले.2 / 8अभिनेता रणवीर सिंग पत्नी दीपिकापेक्षाही जास्त शिकला आहे. रणवीरने मुंबईच्या 'एचआर कॉलेज'मधून कॉमर्स अॅंड इकोनॉमिक्सचे शिक्षण घेतले आहे. तसेच त्याने अमेरिकेच्या इंडियाना युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली आहे.रणवीर सिंगने बॅंड बाजा बारात सिनेमातून सिनेसृष्टीतून पदार्पण केले. यानंतर युनिव्हर्सिटीमधून त्याने अभिनयाचे शिक्षण घेतले.3 / 8गंगुबाई काठियावाडी फेम आलिया भटने फक्त १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. आलिया भट जमनाबाई नरसी स्कूल मधून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे आणि त्यानंतर तिने शिक्षण सोडून दिले आहे. करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले.4 / 8कपूर कुटुंबात रणबीर कपूर एकमेव सदस्य जास्त शिकलेला आहे. रणबीरने न्यूयॉर्कच्या स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स मधून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले आहे. तसेच त्याने ली स्ट्रासबर्ग थिएटरमधूनही अभिनयाचे धडे गिरवले. संजय लीला भन्साळीच्या सावरिया सिनेमातून पदार्पण केले5 / 8बॉलिवुड ते हॉलिवुड इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने सुरुवातीला अमेरिकेतून शिक्षण केले आहे. तिथे तिने थिएटर क्षेत्रात शिक्षण घेतले आहे.त्यानंतर ती ३ वर्षांनी भारतात परत आली.आर्मी पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले. मिस वर्ल्ड २००० चे टायटल प्रियांकाने जिंकले आहे.6 / 8विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने केवळ १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मुंबईच्या डी जी रुपारेल कॉलेजमधून शिक्षण घेतले. मात्र अभिनय क्षेत्रात आल्याने तिने पुढे शिक्षण घेतले नाही. तिने शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले आहे. ऐश्वर्याने १९९४ साली मिस वर्ल्ड हे टायटल जिंकले आहे.7 / 8कतरिना कैफ अशी बॉलिवुड अभिनेत्री आहे जी कधीही शाळेत गेलेली नाही.तिचे कुटुंब सतत स्थलांतर करत असल्याने तिला कधीच शाळेत जाता आले नाही. शिवाय तिने फक्त १४ व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेता सलमान खानने तिला बॉलिवुडमध्ये लॉंच केले. मैने प्यार क्यू किया या सिनेमातून पदार्पण केले.8 / 8बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानने १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियाच्या जनसंवाद विभागातून मास्टर्स केले. यानंतर मात्र त्याने टेलिव्हिजनमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. फौजी या मालिकेतून पदार्पण केले. आणखी वाचा Subscribe to Notifications