१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 12:20 PM1 / 9अभिनेत्री मनीषा कोईराला ९०च्या दशकातील टॉपची अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. कॅन्सरशी यशस्वी झुंज दिल्यानंतर 'डियर माया', 'लस्ट स्टोरी', 'संजू', 'प्रस्थानम' आणि 'शहजादा' यासारख्या सिनेमात काम केले. सध्या ती तिच्या हीरामंडी या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.2 / 9झूमशी बोलताना मनीषा कोईराला हिने तिच्या लव्ह लाइफ, घटस्फोट आणि कॅन्सरच्या लढ्यापर्यंत अनेक गोष्टी शेअर केल्या. तिचे म्हणणे आहे की, लोक किती नशीबवान असतात ज्यांच्या आयुष्यात चढउतार पाहायला मिळत नाही. मात्र शेवटी ते शांत लाइफ जगतात. 3 / 9मनीषाचं म्हणणं आहे की ती नशीबवान आहे. तिला जीवनात खूप गोष्टींचा अनुभव घेता आला. तिने जीवनाकडे वाईट दृष्टीकोनातून पाहिले नाही. तसेच घटस्फोटानंतर तिने स्वतःला खूप मजबूत बनवले. आता ती खूप स्ट्राँग बनली आहे.4 / 9ती पुढे म्हणाली की, माझे काम आहे जे मी बदलू शकते आणि जीवनाकडे कसे पाहते. मी हे पाहतेय की ग्लास अर्धा खाली आहे की भरलेला. आता मी असे जीवन जगणे पसंत करते जसे मला हवे होते. मनीषा कोईरालाचं म्हणणं आहे की, कॅन्सरने तिचे अर्धे आयुष्य बदलवून टाकले. ती कॅन्सरची आभारी आहे कारण तिला उत्तम माणूस बनवलं.5 / 9मनीषाला विचारले की, तिला लाइफ पार्टनर हवा आहे का? त्यावर ती म्हणाली की, नाही बोलणं खोटे ठरेल. मला वाटते की माझ्या आयुष्यात पुरूष पार्टनरस असला पाहिजे. जर माझ्या जीवनात कोणी पार्टनर असेल तर चांगली बाब आहे. मात्र यासाठी वाट पाहत माझा वेळ वाया घालवणार नाही. 6 / 9आता मी ५२ वर्षांची झाली आहे आणि कुटुंब बनवण्यासाठी खूप वेळ लागला आहे. कधी कधी मी विचार करते की जर माझा नवरा असता तर जीवन किती सोपे असते. जर माझ्या नशीबात लिहिले असेल तर मिळेल. जर नसेल तरी ठीक आहे. मला वाटते की माझे आयुष्य मी मोकळेपणाने जगते आहे.7 / 9९०च्या दशकात मनिषाचे करिअर यशाच्या शिखरावर होते. तिचे नाव जवळपास १२ लोकांसोबत जोडले गेले होते. जे सिनेइंडस्ट्री आणि इतर क्षेत्रात कार्यरत होते.8 / 9 मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिझनेसमन सम्राट दहलसोबत लग्न करण्यापूर्वी तिचे नाव विवेक मुशरान, नाना पाटेकर, डीजे हुसैन, नाइजीरियाई बिझनेसमन सेसिल अँथनी, आर्यन वैद, प्रशांत चौधरी, ऑस्ट्रेलियाई राजदूत क्रिस्पिन कॉनरॉयसोबत जोडले गेले होते.9 / 9मनिषाने २०१० साली नेपाळचा बिझनेसमन सम्राट दहलसोबत लग्न केले होते. मात्र २ वर्षात ते वेगळे झाले. २०१२ मध्ये पतीसोबत वेगळे झाल्यानंतर ती एकाकी जीवन जगत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications