१२ अफेयर तरीही अभिनेत्रीला मिळालं नाही प्रेम; संसारही मोडला, म्हणते - "मी चुकीच्या पुरुषांसोबत..." By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 3:24 PM1 / 12५३ वर्षीय या अभिनेत्रीला प्रेमात विश्वासघात, ब्रेकअप, लग्न आणि नंतर घटस्फोट यांसारख्या दु:खावर मात केल्यानंतर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागले होते. 2 / 12ही अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला. हीरामंडी वेबसीरिजमुळे ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केलाय.3 / 12मनीषा फिल्मफेअरसोबतला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, 'माझ्या लक्षात आले की मी फक्त चुकीच्या पुरुषांच्याच प्रेमात का पडली? मी हे पुन्हा पुन्हा का करत आहे, असा प्रश्न मला पडला. माझ्यात काहीतरी चूक आहे की मी फक्त सर्वात त्रासलेल्या किंवा चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित होते. ज्याला मी स्वतःमध्ये झाकून पाहिले. मला ज्या गोष्टीचा त्रास होत होता त्यावर मी निर्णय घेतला आणि काम केले.4 / 12मनीषा म्हणते की ती आता एकटी आहे, पण तिला आता कोणाशीही संबंध ठेवायचे नाहीत. ती म्हणाली, 'गेल्या ५-६ वर्षांपासून मी एकटी आहे आणि सध्या मी कोणाशीही मिसळण्याच्या मनस्थितीत नाही. मला अजूनही वाटते की मला स्वतःवर खूप काम करावे लागेल.5 / 12मनीषा सांगते की, वारंवार वाईट नात्यात आल्यानंतरही तिचा प्रेमावरील विश्वास उडाला नाही. तिला आशा आहे की तिला एक चांगला आणि खरा जोडीदार मिळेल जो तिला समजून घेईल आणि तिच्याशी प्रामाणिक असेल.6 / 12मनीषा म्हणाली की, मला चांगल्या रिलेशनशीप हवंय. ज्यात मला वाटेल की आम्ही दोघे एकमेकांना स्वीकारू शकतो. एकमेकांसाठी प्रामाणिक असू. हे समजणे खूप महत्त्वाचे आहे की आपल्याला पुढे जाण्यासाठी काय शिकण्याची गरज आहे. हेदेखील महत्त्वाचे आहे की एकमेकांच्या प्रवासात एकमेकांना साथ देऊ शकतो का? मी अशाच व्यक्तीसोबत राहू इच्छिते ज्याच्याकडे स्वप्ने आहेत. महत्त्वाकांक्षा आहेत. मी खूप भावुक व्यक्ती आहे.7 / 12मनिषा सांगते की, जेव्हा ती चित्रपटात आली तेव्हा ती बाहेरची होती. ती निर्दोष होती. एकामागून एक संकटांना सामोरे जात असताना तिला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजला. 8 / 12ती म्हणाली, मी बाहेरची कलाकार होते, नेपाळहून आले होते. मला बरोबर की चूक कळत नव्हते. एकटेपणा प्रियकर किंवा जोडीदार भरून काढू शकतो असे मला वाटायचे, पण तसे कधी झाले नाही. 9 / 12ती सगळी माणसं नात्याबद्दल खूप रोमँटिक बोलत असत. प्रत्येक वेळी मी त्यांना माफ करून पुढे जायचे. कालांतराने आणि वयानुसार, मला जाणवले की मी माझ्या आजूबाजूला अनेक अनावश्यक लोक एकत्र केले आहेत, असे ती म्हणाली.10 / 12९०च्या दशकात जेव्हा मनीषाचे करिअर यशाच्या शिखरावर होते तेव्हा तिचे नाव जवळपास १२ लोकांशी जोडले गेले होते. ते चित्रपटसृष्टीव्यतिरिक्त इतर क्षेत्रांशी संबंधित होते. 11 / 12मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिझनेसमन सम्राट दहलसोबत लग्न करण्यापूर्वी मनीषाचे नाव विवेक मुशरन, नाना पाटेकर, डीजे हुसैन, नायजेरियन बिझनेसमन सेसिल अँथनी, आर्यन वैद, प्रशांत चौधरी, ऑस्ट्रेलियाचे राजदूत क्रिस्पिन कॉनरॉय यांच्याशी जोडले गेले होते.12 / 12प्रेमात वारंवार फसवणूक झाल्यानंतर तिने नेपाळी उद्योगपती सम्राट दाहलशी लग्न केले. मात्र २०१२ मध्ये ती पतीपासून वेगळी झाली. त्यानंतर, मनीषा तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मात्र, अजूनही ती खऱ्या प्रेमाचा शोध घेत असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवते. आणखी वाचा Subscribe to Notifications