Join us

Medha Shankar : "अकाऊंटमध्ये फक्त 257 रुपये शिल्लक, खचले होते..."; '12th फेल' अभिनेत्रीने सांगितला संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 3:56 PM

1 / 12
विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर स्टारर चित्रपट '12th फेल' हा गेल्या वर्षीचा म्हणजेच 2023 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. फक्त लोकांनाच नाही तर बॉलीवूड सेलिब्रिटींनीही हा चित्रपट प्रचंड आवडला आहे.
2 / 12
विक्रांतने यामध्ये आयपीएस अधिकारी मनोज कुमार यांची तर मेधाने आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांची भूमिका साकारली आहे. पडद्यावर दोघांची चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. याला IMDB लिस्टमध्ये सर्वाधिक 9.1 रेटिंग मिळालं आहे.
3 / 12
टॉप 250 भारतीय चित्रपटांच्या यादीतही या चित्रपटाचा समावेश झाला आहे. याच दरम्यान आता अभिनेत्रीला तिचे संघर्षाचे दिवस आठवले आहेत. तिने सांगितलं की, एक वेळ अशी होती की तिच्या अकाऊंटमध्ये फक्त 257 रुपये शिल्लक होते.
4 / 12
अभिनेत्री मेधा शंकरने IMDB शी खास संवाद साधला. यावेळी तिने संघर्षाचे दिवस आठवले. ती म्हणाली की, 12th फेल साठी खूप वेळ लागला. तिने 2018 मध्ये मुंबईत आपल्या करिअरला सुरुवात केली. 2022 मध्ये तिने पहिल्यांदा या चित्रपटासाठी कास्टिंग एजन्सीकडे ऑडिशन दिले.
5 / 12
यानंतर ती दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि त्यांच्या टीमसोबत स्क्रीन टेस्टसाठी गेली. अभिनेत्रीने सांगितलं की ऑडिशन दरम्यान तिला वाटत होतं की ही भूमिका फक्त तिच्यासाठी आहे, जे नंतर खरं ठरलं. तिला विधू विनोद चोप्रा यांचा फोन आला.
6 / 12
मेधा शंकरने सांगितलं की, चित्रपटात मुख्य भूमिका मिळाल्यानंतर तिने वडिलांना मिठी मारली. भावाला फोन केला. हा क्षण खूप भावूक होता आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.
7 / 12
संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देताना अभिनेत्री म्हणते की, तिने तिच्या कारकिर्दीत अनेक आव्हानांचा सामना केला आहे. 2020 हे तिच्यासाठी खूप वाईट वर्ष ठरलं कारण जगभरात अनेक गोष्टी घडत होत्या. यादरम्यान ती खूपच खचली होती. तिच्या अकाऊंटमध्ये फक्त 257 रुपये शिल्लक होते.
8 / 12
प्रसिद्धी, ग्लॅमर, सौंदर्य, चांगले कपडे आणि अटेन्शन मिळावं म्हणून तिला अभिनेत्री बनायचं नव्हतं. या सगळ्यासाठी अभिनयात यायचं नव्हतं. या सर्व गोष्टींचा तिने कधीच विचार केला नसल्याचं ती सांगते. क्राफ्ट आणि आर्टमध्ये ती पूर्णपणे बुडलेली असल्यामुळेच तिला अभिनेत्री व्हायचं होतं.
9 / 12
अभिनय हेच तिचे जग आहे हे तिला माहीत होते. ती दिल्ली एनसीआरमधील नोएडा येथील रहिवासी आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती शास्त्रीय गायिका आणि मॉडेल देखील आहे.
10 / 12
मेधा शंकरने दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन मॅनेजमेंटमध्ये डिग्री मिळवली. मेधाचे आता असंख्य चाहते आहेत.
11 / 12
12 / 12
टॅग्स :बॉलिवूड