लोक मला कोरोना व्हायरस म्हणून चिडवतात...! बॉलिवूड अभिनेत्री वैतागली By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 2:20 PM1 / 9मुळात ती मणिपुरी अभिनेत्री. पण बॉलिवूडमध्येही झळकलेली. तिचे नाव लिन लॅशराम. ( Lin Laishram)2 / 9ओम शांती ओम, रंगून, मेरी कॉम यासारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांत लिन झळकली आणि तिच्या सुंदर चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.3 / 9आज लिन एक सेलिब्रिटी आहे. पण तरिही वर्णद्वेषाला, लोकांच्या हेटाळणीला तिला सामोरे जावे लागते. फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत तिने एक धक्कादायक अनुभव सांगितला.4 / 9होय, घराबाहेर पडली की काही टवाळखोर, गल्लीछाप लोक तिला कोरोना व्हायरस म्हणून चिडवतात, असे तिने सांगितले.5 / 9एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ती बोलली. मी आईबाबांना एअरपोर्टवर सोडायला गेले होते. तिथून घरी परतत असताना दोन लोकांनी माझा पिच्छा केला. कोरोना व्हायरस, कोरोना व्हायरस म्हणून ते मला चिडवू लागले. तो प्रकार माझ्यासाठी धक्कादायक होता, असे तिने सांगितले.6 / 9 काही कोरोना व्हायरस म्हणतात, काही मांजर म्हणतात. हा त्रासदायक अनुभव मी गेल्या कित्येक वर्षांपासून सहन करतेय. याचा प्रचंड मानसिक त्रास होतो, असे ती म्हणाली.7 / 9 लिन एक लोकप्रिय मॉडेल आहे. शिवाय नॅशनल लेव्हल आर्चरही आहे. नशीरूद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रूपमध्ये तिने अनेक वर्षे काम केले आहे.8 / 92014 साली रिलीज ‘मेरी कॉम’ या सिनेमात लिनने प्रियंका चोप्राच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्याआधी 2007 साली शाहरूख खान व दीपिका पादुकोणच्या ‘ओम शांती ओम’ या सिनेमात ती कॅमिओ रोलमध्ये दिसली होती.9 / 9बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा लिनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. 2018 मध्ये नवी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये रणदीप व लिन यांना पहिल्यांदा एकत्र पाहिले गेले होते. यानंतर दोघांच्या लव्हलाईफच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications