Join us  

अवघ्या २२ वर्षांची मुलगी... २ मुलांची आई... पुष्पा-२ मध्ये आयटम साँगसाठी नावाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 10:27 PM

1 / 9
Pushpa 2 Item Song Gossip: तुम्हाला 'ओ अंटावा' हा आयटम नंबर नक्कीच आठवत असेल. अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटात समंथा रूथ प्रभूने यात डान्स केला होता. आता पुष्पा-2 चित्रपटात एक नवी नायिका ही जागा घेणार असल्याची चर्चा आहे.
2 / 9
पहिल्या चित्रपटात समंथाने तो डान्स लोकप्रिय केला होता. आता या 'पुष्पा-2' या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी चित्रपटात नवी अभिनेत्री दिसणार आहे.
3 / 9
'पुष्पा द रुल'चे शूटिंग तसेच पोस्ट प्रोडक्शनचे काम सध्या जोरात सुरू आहे. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, चित्रपटातील आयटम नंबरसाठी नवीन चेहरा दिसणार आहे.
4 / 9
तेलुगू सिनेमाची उगवती अभिनेत्री श्रीलीला, जी तिची डॉक्टरेट करत आहे, ती आघाडीवर असल्याचे सांगितले जाते.
5 / 9
संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद उर्फ ​​डीएसपी यांनी चित्रपटासाठी जवळपास सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. नवे आयटम साँग 'ऊ अंटावा' पेक्षा अधिक मधुर, मोहक आणि मादक असणार आहे असे बोलले जात आहे.
6 / 9
या आयटमचे चित्रीकरण करणारी श्रीलीला ही अलीकडच्या काळातील तेलुगू चित्रपटसृष्टीतील झपाट्याने उगवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
7 / 9
तिने आतापर्यंत अभिनेता पवन कल्याणच्या 'उस्ताद भगतसिंग', महेश बाबूच्या 'गुंटूर करम'मध्ये दिसली आहे आणि एक चित्रपट साइन केला आहे.
8 / 9
अमेरिकेत जन्मलेली श्रीलीला ही बंगळुरू येथील एका प्रख्यात उद्योगपतीची मुलगी आहे. श्रीलीलाने चार वर्षांपूर्वी कन्नड सिनेमात पदार्पण केले होते, पण आता तिचे पूर्ण लक्ष तेलुगू सिनेमावर आहे.
9 / 9
22 वर्षीय अभिनेत्रीने दोन अपंग मुले दत्तक घेतल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी या मुलांना दत्तक घेतले.
टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनसमांथा अक्कीनेनीबॉलिवूड