Photos : 'या' बॉलिवूड कलाकारांनी रुपेरी पडद्यावर साकारल्या शिक्षकांच्या भूमिका By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 5:26 PM1 / 11 ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपण पडद्यावरही असे काही चित्रपट असे पाहिले आहेत, ज्यांनी आपल्याला आयुष्याचा धडा शिकवला आहे. 2 / 11 थ्री इडियट्स (२००९) _ या हिंदी चित्रपटात बोमन इराणी हे डॉ. विरू सहस्त्रबुद्धे अर्थात व्हायरस या भूमिकेत दिसले. ते अत्यंत कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून पडद्यावर दिसले. तीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. 3 / 11हिचकी (२०१८) : या चित्रपटात राणी मुखर्जी हिने नैना माथूर या शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. तिला झाेपडपट्टीतील मुलांना शिकवण्याचे आव्हान दिलेले असते. ती शाळा आणि समाज यांच्याशी संघर्ष करत त्या मुलांना शिकवते. तिच्या जिद्दीची ही कहाणी या सिनेमात पाहायला मिळते.4 / 11तारें जमीं पर (२००७) : या चित्रपटातून अभिनेता आमिर खान हा राम शंकर निकुंभ या आर्ट टिचरच्या व्यक्तिरेखेत दिसला. त्याच्यासोबत दर्शिल सफारी, टिस्का चोप्रा हे मुख्य भूमिकेत दिसले. हा सायकोलॉजिकल ड्रामा आहे. 5 / 11सुपर ३० (२०१९) : विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन हा एका गणित शिक्षकाच्या भूमिकेत दिसला. आनंद कुमार यांचा हा बायोपिक चित्रपट आहे.6 / 11आरक्षण (२०११) : प्रकाश झा दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि सैफ अली खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. यात अमिताभ बच्चन हे एका तत्त्वनिष्ठ शिक्षकाच्या भूमिकेत दिसतात.7 / 11कुछ कुछ होता हैं (१९९८) : अभिनेत्री म्हणजे अर्चना पुरण सिंग हिने देखील शाहरुखच्या 'कुछ कुछ होता हैं' चित्रपटात एका विनोदी शिक्षकेची भूमिका साकारली होती.8 / 11मैं हूँ ना (२००४) : या चित्रपटात सुष्मिता सेनने साकारलेली चांदनी शिक्षिकेची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिचा बोल्ड अंदाजाने प्रेक्षक घायाळ झाले होते.9 / 11चॉक अँड डस्टर (२०१६ ) : २०१६ साली आलेल्या 'चॉक अँड डस्टर' चित्रपटात अभिनेत्री जुही चावलाने शिक्षकेची भूमिका साकारली होती.10 / 11पाठशाला (२०१०) : मिलिंद उके दिग्दर्शित हा चित्रपट 'शाळा' या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत शाहिद कपूर, आयेशा टाकिया, श्रद्धा आर्या, नाना पाटेकर, सुशांत सिंग हे दिसले. हा चित्रपट शिक्षणव्यवस्था आणि त्यातील त्रुटी यावर आधारित आहे.11 / 11इंग्लिश विंग्लिश (२०१२) : गौरी शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिने शशी गोडबोले ही व्यक्तिरेखा साकारली आहे. इंग्रजी बोलण्यावरून तिला तिचा पती आणि मुलगी दोघेही हसायचे. त्यामुळे तिच्या आत्मसन्मानासाठी ती इंग्रजीचा कोचिंग क्लास जॉइन करते. तिच्या एकंदरीत संपूर्ण प्रवासावर हा चित्रपट आधारित आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications