Join us

A R Rahman Love story : मुलीला बघायला गेले अन् बहिणीला पसंत केली... वाचा ए आर रहमानची फिल्मी 'लव्ह स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 2:26 PM

1 / 8
प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान (A R Rahman) यांची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. त्यांनी कंपोज केलेल्या गाणी जगभरात गाजली आहेत. 'जय हो','ताल','तु ही रे','कहना ही क्या' असे त्यांचे एकापेक्षा एक गाणी आणि अल्बम हिट आहेत. शांत स्वभावाचे ए आर रहमान यांचं कामच बोलून दाखवतं.
2 / 8
ए आर रहमान यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहित असेलच. पण त्यांची पत्नी सायरो बानो (Saira Banu) नेमकी कोण आहे. दोघांची भेट नेमकी कुठे झाली, त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली हे जाणून घेऊया.
3 / 8
सायरा बानो यांचे वडील व्यावसायिक होते. सायरा यांच्या दोन बहिणी आहेत. मेहरने साऊथ सुपरस्टार राशिन रहमानसह लग्न केले. राशिन मल्याळम सिनेमात काम करतात. त्यांनी २०० पेक्षा अधिक सिनेमात काम केलं आहे.
4 / 8
ए आर रहमान आणि सायरो बानो यांचं 1995 साली लग्न झालं. असं म्हणतात की ए आर रहमान यांची आई करिना बेगम यांनीच मुलासाठी सायरो बानो यांच्या बहिणीला पसंत केले होते. तिचं नाव मेहर असं होतं.
5 / 8
ए आर रहमान यांची आई जेव्हा चेन्नईत सायरा यांच्या घरी पोहोचली. त्यांना खरं तर मेहर आवडली होती. मेहरच्या वडिलांनी नकार दिला. कारण त्यांना आधी मोठ्या मुलीचं लग्न लावायचं होतं. तेव्हा त्या सायराला भेटल्या. त्यांना सायराचा स्वभाव आवडला. तेव्हा त्यांनी सायराला पसंत केले.
6 / 8
47 वर्षीय सायरा बानो यांनी एका मुलाखतीत सांगितले,'लग्नाआधी मी रहमान यांना दोन प्रश्न विचारले होते. लग्नानंतर मी इंग्रजीत बोलू शकते का? आणि मी कार ड्राईव्ह करु शकते का? यावर रहमान यांनी होकार दिला.
7 / 8
अशा प्रकारे 27 वर्षीय ए आर रहमान आणि 21 वर्षीय सायरा यांचं लग्न ठरलं. मार्च 1995 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. त्यांना एक मुलगा आणइ दोन मुली आहेत. मुलाचं नाव ए आर आमीन असं आहे तर मोठी मुलगी खातिजा सुद्धा संगीतक्षेत्रात आली आहे.
8 / 8
सायरा बानो यांनी अनेकदा सांगितले आहे की त्या ए आर रहमान यांच्या चाहत्या आहेत. त्या सतत नवऱ्याची गाणी ऐकत असतात कारण त्या रहमान यांच्या आवाजाच्या प्रेमात पडल्या आहेत.
टॅग्स :ए. आर. रहमानपरिवारपती- जोडीदारदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट