कमाईच्या बाबतीतही आमिर आहे 'परफेक्ट'; आलिशान घर, लक्झरी कारसह इतकी आहे अभिनेत्याची Net Worth By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 1:07 PM1 / 10प्रत्येक चित्रपटाची चोखंदळपणे निवड करण्यामुळे अभिनेता आमिर खान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शननिस्ट म्हणून ओळखला जातो. (photos : Avinash Gowariker instagram)2 / 10आजपर्यंत आमिरने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तो कायम चर्चेत असतो.3 / 10कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थिती न लावणारा आमिर त्याच्या याच वेगळ्या शैलीमुळे कायम चर्चेत येतो. विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असलेल्या या अभिनेत्याची एकूण संपत्ती किती असेल असाही प्रश्न अनेकांना पडतो.4 / 10caknowledge च्या माहितीनुसार, आमिरची एकूण संपत्ती १५६२ कोटी रुपये इतकी आहे.5 / 10आमिर महिन्याला साधारणपणे एका महिन्यात १० कोटी रुपये कमवतो. तर त्याचं वार्षिक उत्पन्न १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.6 / 10जाहिराती, चित्रपटांची निर्मिती, स्टेज परफॉर्मन्स यांच्या माध्यमातून आमिरची सर्वाधिक कमाई होते.7 / 10आमिर एका जाहिरातीसाठी साधारणपणे १०- १२ कोटी रुपये मानधन घेतो. तर चित्रपटासाठी ५० कोटी.8 / 10आमिरने २००९ मध्ये मुंबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत १८ कोटी असल्याचं सांगण्यात येतं.9 / 10आमिरने अन्य प्रॉपर्टींमध्येही आर्थिक गुंतवणूक केली आहे.10 / 10आमिरकडे ९ लक्झरी कार आहेत. त्यांची किंमत १५ कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये मर्सिडीज बेंझ, रॉल्स रॉज, फोर्ड यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications