IN PICS : एका मुलीच्या नकारामुळे आमिर खानने केलं होतं टक्कल, मजेदार आहे 38 वर्षाआधीचा किस्सा... By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 4:41 PM1 / 8बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान सध्या त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिरचा हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे.2 / 8गेल्या काही दिवसांपासून आमिरच्या पर्सनल लाईफची चर्चाही जोरात आहे. काही महिन्यांपूर्वीच दुसरी पत्नी किरण राव हिला घटस्फोट देणार असल्याचं आमिरने जाहिर केलं होतं.3 / 8आमिरनं दोन लग्न केलीत. ही दोन्ही लग्न अयशस्वी ठरलीत. त्याआधीही आमिरच्या आयुष्यात एक मुलगी होती. होय, आमिर तिच्यासाठी अगदी वेडा होता. एका मुलाखतीत त्याने स्वत: हा किस्सा सांगितला होता.4 / 8 1984 साली ‘होली’ या चित्रपटाच्या रिलीजआधी आमिरच्या हेअरस्टाईलची जबरदस्त चर्चा झाली होती. आमिरने पूर्ण टक्कल केल्यानं सगळेच त्यावेळी हैराण झाले होते. हे टक्कल एका प्रेमात वेड्या झालेल्या तरूणाची ‘रिअॅक्शन’ होती.5 / 8होय, सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत आमिरने याचा खुलासा केला होता. ‘मी चित्रपटासाठी टक्कल केल्याचं लोकांनी मानलं होतं. पण मी वेगळ्या कारणानं टक्कल केलं होतं,’असं आमिर म्हणाला होता.6 / 8हे कारण काय होतं, तर एका मुलीने आमिरला नकार दिला होता. आमिरचं एका मुलीवर प्रेम होतं. ती त्याला सोडून गेली होती. ते दु:ख अनावर झाल्यानं आमिरनं टक्कल केलं होतं.7 / 8माझी ती प्रतिक्रिया फारच बालिश होती. जेव्हा मी ‘होली’च्या दिग्दर्शकांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला माझ्या डोक्यावरचे केस कुठे गेले असा प्रश्न विचारला होता, असा खुलासाही आमिरने मुलाखतीत केला होता.8 / 8आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होतोय. या चित्रपटात त्याच्यासोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications