मेंटल असल्याचा टॅग लागलेला आमिरचा भाऊ सध्या कुठे आहे? जाणून घ्या कधीही समोर न आलेल्या गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 6:00 AM1 / 15 अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान सध्या एका कारणामुळे चर्चेत आला आहे. फैजल खानने इंडस्ट्रीमध्ये त्याला कशी वागणूक दिली गेली याविषयी पहिल्यांंदाचा मौन सोडले आहे. 2 / 15फैजलने सांगितले की, बॉलिवूडमध्ये गटबाजी व मक्तेदारीचा त्रास अधिक असल्याचा खुलासा त्याने केला आहे. माझ्यासोबतही अन्याय झालाय. जर तुमचे काही चित्रपट फ्लॉप झाले असतील तर कोणीही तुमच्याशी चांगले वागणार नाही. 3 / 15करण जोहरने एका पार्टीत माझा अपमान केला होता. त्या पार्टीत उपस्थित व्यक्तीशी मला बोलुसुद्धा दिले गेले नाही. 4 / 15गेल्या अनेक वर्षापासून लाइमलाइटपासून दूर असलेला फैजल सध्या कुठे आहे आणि या दिवसात तो काय करतोय हे जाणून घेण्याचीही तुमची उत्सुकता असणार. 5 / 15 फैजल फिल्मी दुनियेपासून दूर आहे. पण अलीकडेच अशी बातमी आली होती की तो लवकरच एक सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. 6 / 15'फॅक्टरी' नावाच्या चित्रपटाद्वारे तो पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली होती. याबद्दल बोलताना फैजल म्हणाले- “फॅक्टरी हा माझा ड्रिम प्रोजेक्ट आहे. 7 / 15 दिग्दर्शक शीरीक मिनहाज यांनीच सिनेमात मी गाणे गायला हवे असे सांगितले तेव्हा मला धक्काच बसला. ते म्हणाले की या गाण्यासाठी माझा आवाज अतिशय योग्य आहे. यानंतर खूप विचार केला आणि यासाठी होकार दिला.8 / 15१९69 साली प्रदर्शित झालेला 'प्यार का मौसम' या चित्रपटात फैजल खानने छोटीशी भूमिका साकारली होती. बालकलाकार म्हणून त्याने कामाला सुरूवात केली होती.9 / 15त्यानंतर 1988 साली भाऊ आमिर खानच्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका केली होती. (1990) साली वडिलांच्या 'तुम मेरे हो' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. यात त्याचा भाऊ आमिर मुख्य भूमिकेत होता. पाच वर्षांनंतर तो मेला (2000) साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातही झळकला. 'मेला' या चित्रपटात फैजल भाऊ आमिर खान आणि ट्विंकल खन्नासोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नव्हता, परंतु त्याची गाणी खुप लोकप्रिय झाली होती.10 / 15याशिवाय 2003 मध्ये तो टीव्ही शो 'आंधी' मध्ये तो झळकला. 2005 मध्ये चांद बुझ गया' हा चित्रपटही केला. आपल्या कारकीर्दीत फैजलने केवळ 6-7 चित्रपट केले आहेत.त्यानंतर तो इंडस्ट्रीतून गायब झाला. 2007 साली जेव्हा त्याने घर सोडल्याची बातमी आली तेव्हा तो चर्चेत आला. संपूर्ण कुटुंब त्याचा शोध घेऊ लागले.11 / 15 काही काळानंतर त्याच्या मानसिक आजाराच्या बातम्या आल्या. या मुलाखतीत फैजलने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते - 'मला माझ्या कुटुंबासह आलेल्या अनेक अडचणींचा सामान करावा लागला होता. तो काळ माझ्यासाठी संघर्षाचा काळ होता. त्याचदरम्यान मी मेंटल असल्याचाही ठपका माझ्यावर लावण्यात आला. तो माझ्यासाठी खूप कठिण काळ होता. 12 / 15 'मला मानसिक आजार असल्याचे सांगण्यात यायचे. प्रत्येक व्यक्तीला मी मेंटल नाही याचा पुरावा देणे शक्य नाही. अनेकांना मी मेंटल असल्याच्या अफवांवर विश्वासही ठेवला. कोणाकोणाला मी समजवणारा अशी माझी अवस्था झाली होती. माझे कामच माझ्याविषयीची सत्यता सिद्ध करेल.13 / 15 'मला मानसिक आजार असल्याचे सांगण्यात यायचे. प्रत्येक व्यक्तीला मी मेंटल नाही याचा पुरावा देणे शक्य नाही. अनेकांना मी मेंटल असल्याच्या अफवांवर विश्वासही ठेवला. कोणाकोणाला मी समजवणारा अशी माझी अवस्था झाली होती. माझे कामच माझ्याविषयीची सत्यता सिद्ध करेल.14 / 15चित्रपटात मानसिक व्यक्ती कशी अभिनय करू शकते? कोर्टानेही मला सामान्य असल्याचे सिद्ध केले होते. 15 / 15जेव्हा हे सर्व प्रकरण चालू होते तेव्हा एक वाईट वेळ होती असे समजून सगळ्या गोष्टी पाठीच सोडल्या आहेत. आज आम्ही सर्व माझ्या कुटुंबासह एकत्र आहोत. आणखी वाचा Subscribe to Notifications