पहिला चित्रपट ठरला सुपर डुपर हिट, एका दिवसात केले ४७ सिनेमे साईन, तरीही बुडालं करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:03 IST
1 / 10 ९०च्या दशकातील एक अभिनेता प्रचंड गाजला होता. स्टारडममध्ये शाहरुख-सलमानला टक्कर देणाऱ्या अभिनेत्यानं १ दिवसांत ४७ सिनेमे साइन केले होते. 2 / 10पहिल्याचं चित्रपटानं अभिनेत्याला रातोरात स्टार बनवलं होतं. तो अभिनेता होता राहुल रॉय (Rahul Roy) आणि त्याचा पहिला चित्रपट होता 'आशिकी'. 3 / 10 'आशिकी' सिनेमातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर असतात. राहुल रॉयनं 'आशिकी' सिनेमातून पदापर्ण केलं आणि त्याचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला. 4 / 10या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवलं. सगळीकडे फक्त आणि फक्त राहुल रॉयचा बोलबाला होता. प्रत्येक चित्रपट निर्मात्याला राहुल रॉयसोबत काम करायचं होतं.5 / 10त्याला साईन करण्यासाठी घरासमोर निर्मात्यांची रांग लागायची. राहुल रॉयने अवघ्या ११ दिवसांत ४७ चित्रपट साईन करण्याचा विक्रम केला होता.6 / 10पण, राहुल रॉयकडून मोठी चूक घडली. ती म्हणजे राहुलने यश चोपडा यांचा 'डर' चित्रपट नाकारला. राहुलने नकार दिल्यावर शाहरुखने 'डर' चित्रपट केला आणि याच सिनेमानं त्याला स्टारडम मिळवून दिलं. 7 / 10अभिनेत्याने श्रीदेवीसोबत १ चित्रपट, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि करिश्मा कपूरसोबत प्रत्येकी २ चित्रपट, पूजा भटसोबत ३ चित्रपट केले आणि ते सर्व बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले.8 / 10राहुल रॉयची नशीबाने साथ सोडली. राहुलने 'जानम', 'फिर तेरी याद आयी', 'गुमराह', 'सपने साजन के' आणि 'मझदार' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण सर्व चित्रपट काही खास कामगिरी करू शकले नाहीत. 9 / 10सलग सिनेमे फ्लॉप होत असल्यानं अभिनेत्यानं काही वर्षांसाठी ब्रेक घेतला. यानंतर तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनमध्ये आला आणि त्याचा विजेता बनून सर्वांना आश्चर्यचकित केलं.10 / 10पण तरीही त्याचा कारकिर्दीत त्याला काही फायदा झाला नाही. अखेर चित्रपटांपासून दूर जात त्यानं कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.