Join us

ऐश्वर्या- अभिषेकचा Vacation mood! मालदीवमध्ये एका दिवसासाठी देतायेत इतकं भाडं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 1:07 PM

1 / 10
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय- बच्चन.
2 / 10
ऐश्वर्या सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसली तरीदेखील अभिषेक अनेकदा इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील लहान-लहान अपडेट्स चाहत्यांना देत असतो.
3 / 10
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन आणि लेक आराध्या बच्चन यांच्यासोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय. या व्हेकेशन्समधील काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 10
ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांची लेक आराध्या हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेले आहेत.
5 / 10
येत्या १६ नोव्हेंबरला आराध्या १० वर्षांची होईल. त्यामुळे तिचा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी ही जोडी मालदीवला गेली आहे.
6 / 10
सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक मालदीवमधील एका लॅविश Villa मध्ये थांबले आहेत. विशेष म्हणजे हा Villa प्रचंड महाग असून त्याचं एका दिवसाचं भाडं ६० हजारांपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येतं.
7 / 10
अभिषेक मालदीवच्या The Amilla रिजॉर्ट अॅण्ड रेजिडेंसेस येथे थांबले आहेत.
8 / 10
The Amilla रिजॉर्ट अॅण्ड रेजिडेंसेस हा समुद्र किनाऱ्याजवळ असून निळाशार समुद्रा या Villaच्या प्रत्येक खिडकीतून दिसतो.
9 / 10
या रिजॉर्टमध्ये वेगवेगळ्या किंमतीचे Villa आहेत. ज्याची किंमत १३०० डॉलर्सपासून १३,७०० डॉलर्सपर्यंत आहेत. थोडक्यात भारतीय चलनानुसार, त्याची किंमत ९६ हजारपासून ते १० लाख रुपयांपर्यंत आहे.
10 / 10
यामध्येच ऐश्वर्या- अभिषेक राहत असलेल्या Villaचं एका रात्रीचं भाडं एक हजार डॉलर म्हणजेच ७६ हजार रुपये आहे.(फोटो सौजन्य: Amilla Maldives इन्स्टाग्राम पेज)
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनबॉलिवूडमालदीव