In Pics : 'विश्वसुंदरी' ऐश्वर्यासमोर मालदीवचा नजाराही पडला फिका, पती अभिषेकने शेअर केले Photos By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 2:46 PM1 / 9बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने नुकताच ५ फेब्रुवारी रोजी ४७ वा वाढदिवस साजरा केला. त्याने पत्नी ऐश्वर्या आणि लेक आराध्यासह मालदिव मध्ये सुट्टीचा आनंद घेतला.2 / 9अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या म्हणजे आदर्श कपल. आता तर त्यांची लेक आराध्याही मोठी झाली आहे आणि तिच्या साधेपणाने लक्ष वेधून घेत आहे. 3 / 9अभिषेकने कुटुंबासोबतचे मालदीवमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात त्याने मालदीवचा नजारा, सौंदर्य दाखवले आहे. पण खरी सुंदरता तर अभिषेकच्या समोर बसली आहे जिचा फोटो त्याने शेअर केला आहे.4 / 9पहिल्या फोटोत अभिषेक ने दूरवर दिसणारा निळाशार समुद्राचा फोटो पोस्ट केला आहे. या नजाऱ्याकाठीच बीचवर टेबल खुर्ची ठेवली आहे.5 / 9तर आणखी एका फोटोत सजावट केलेली प्लेट ठेवली आहे. यामध्ये हॅपी बर्थडे अभिषेक असे लिहिले आहे. तर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांचे नाव लिहित वेलकम होम लिहिले आहे.6 / 9याशिवाय त्याने मालदीवच्या सूर्यास्ताचा सुंदर फोटो शेअर केला आहे. मालदीवचा अप्रतिम नजारा फोटोत कॅप्चर झाला आहे. 7 / 9या सगळ्या फोटोंनंतर सर्वात शेवटी अभिषेकने पत्नी ऐश्वर्याचा फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाच्या सूटमध्ये ऐश्वर्या खरोखर विश्वसुंदरी दिसते. निळ्या डोळ्यांमुळे तिच्या सुंदरतेत भर पडली आहे.8 / 9मालदीवचे काही सुंदर नजारे विशेषत: शेवटचा फोटो असं क्युट कॅप्शनही त्याने दिलं आहे. अनिल कपूरनेही या फोटोंवर कमेंट केली करत स्तुती केली आहे.9 / 9अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला १६ वर्ष झाले आहेत. तर त्यांची लेक आराध्या ११ वर्षांची आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications