विकीची आई लाडक्या सुनेला लाडाने 'या' नावाने हाक मारतात, कतरिना कैफने केला खास खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:31 IST
1 / 7कतरिना कैफ आता कौशल कुटुंबाची सून आहे. विकी आणि कतरिना या दोघांनी ९ डिसेंबर २०२१ ला एकमेकांशी लग्नगाठ बांधली2 / 7विकी-कतरिना हे अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी अचानक लग्न करुन त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला3 / 7विकी-कतरिना सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे अनेक फोटो पोस्ट करत असतात. दोघांच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव होत असतो4 / 7कतरिनाने काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये तिच्या सासूबाई म्हणजेच विकीची आई तिला कोणत्या नावाने हाक मारतात याचा खुलासा केला होता5 / 7विकीची आई कतरिनाला 'किट्टो' या अस्सल पंजाबी स्टाईल नावाने हाक मारतात. विकीचे आई-बाबा लाडक्या सुनेची खूप काळजी घेतात 6 / 7सुरुवातीला विकीची आई कतरिनाला प्रेमाने पराठे वगैरे खायला द्यायची. पण कतरिना फिटनेसवर लक्ष देऊन पराठ्यांचा एखादाच घास खायची7 / 7पण नंतर जसं विकीच्या आईला कळलं तेव्हापासून त्या लाडक्या सुनेच्या डाएटची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे कतरिना सुद्धा सासूबाईंच्या प्रेमळ स्वभावाचा वारंवार उल्लेख करते