इंडस्ट्रीत १० वर्ष झाली, तरी मिळतं अभिनेत्यांहून कमी मानधन; म्हणाली, "मी सतत बोलत राहणार..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 16:32 IST
1 / 7मनोरंजनसृष्टीत अभिनेत्रींची नेहमीच एक तक्रार असते की आम्हाला अभिनेत्यांहून कमी मानधन का? अनेकदा अनेक अभिनेत्रींनी जाहीरपणे हा मुद्दा मांडला आहे मात्र तरी परिस्थिती अजून तशीच आहे.2 / 7नुकतंच एका अभिनेत्रीने एका इव्हेंटमध्ये या मुद्द्यावर भाष्य केलं. या अभिनेत्रीला इंडस्ट्रीत १० वर्ष झाली आहेत. अभिनेत्याएवढंच काम करुनही मानधन त्याच्याहून कमीच मिळतं असं ती म्हणाली.3 / 7ही अभिनेत्री आहे भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar). तिने नुकतीच एबीपी न्यूजच्या इव्हेंटला हजेरी लावली. भूमीचा 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमा रिलीज झाला आहे यानिमित्तानेही ती आली होती.4 / 7भूमीने २०१५ साली 'दम लगा के हैशा' सिनेमातून पदार्पण केलं. यानंतर ती 'बधाई दो','पती पत्नी और वो','टॉयलेट एक प्रेम कथा','गोविंदा मेरा नाम' या सिनेमांमध्ये दिसली. 5 / 7गेल्या दशकभरात एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये अभिनेत्याच्या टक्करचं काम करुनही कमी मिळणाऱ्या मानधनावर भूमी म्हणाली, 'मला वाटतं जेंडर पे गॅप हा सगळीकडेच आहे. हे ग्लोबल आहे.एखाद्या कंपनीत महिला सीईओला सुद्धा पुरुषाहून कमी पगार असेल.'6 / 7'मला आठवतंय मी ज्या सिनेमात काम केलं जिथे मी आणि तो अभिनेता दोघंही तेवढ्याच उंचीवर होतो तरी त्याला माझ्यापेक्षा ८० टक्के जास्त मानधन मिळालं होतं.मी तो सिनेमा केला कारण माझ्याकडे पर्यायच नव्हता. '7 / 7'पण मी यावर सतत बोलणार. कारण माझ्याकडे हे व्यासपीठ आहे जिथे मी बोलू शकते. याने फरकही पडला आहे. कारण गेल्या वर्षी मी ज्या प्रोजेक्टमध्ये होते त्यात मला सर्वात जास्त मानधन होतं. याचा मला अभिमान आहे.'