'या' अभिनेत्रीने २३ वर्षांच्या करिअरमध्ये फक्त ७ चित्रपटांमध्ये केलं काम, म्हणाली, "ऑफर्सच नाही..." By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 11:43 AM1 / 9मॉडेलिंग आणि म्युझिक अल्बममधून अभिनयात पदार्पण करणारी अभिनेत्री दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) सध्या यारिया २ मुळे चर्चेत आहे. यावेळी सिनेमात लव्हस्टोरी नसून भावाबहिणीच्या नात्यावर कहाणी आधारित आहे. 2 / 9ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सिनेमातील दिव्याचा लुक चाहत्यांना आवडला आहे. याविषयी दिव्याने सिनेमा, तिची भूमिका, मदरहुड आणि एकंदर प्रवासाविषयी संवाद साधला. हा सिनेमा ती तिच्या भाऊ बहिणींना समर्पित करत आहे.3 / 9दिव्या म्हणाली,'मी आमच्या कुटुंबातली अशी मुलगी होते जी सर्व भावाबहिणींमध्ये शिक्षणात चांगली आहे, आई वडिलांचं ऐकणारी आहे. परफेक्ट मुलगी आहे. त्यामुळे अनेक जण मला घाबरायचे. पण मी मस्तीही तेवढीच करायचे.4 / 9दिव्या म्हणाली,'मी आमच्या कुटुंबातली अशी मुलगी होते जी सर्व भावाबहिणींमध्ये शिक्षणात चांगली आहे, आई वडिलांचं ऐकणारी आहे. परफेक्ट मुलगी आहे. त्यामुळे अनेक जण मला घाबरायचे. पण मी मस्तीही तेवढीच करायचे.5 / 9मी लहानपणी शेजारच्यांची बेल वाजवून पळून जायचे. माझा हा सिनेमा भावाबहिणींना डेडिकेट करते. कित्येक वर्ष झाली मी सगळ्यांना भेटले नाहीये. या सिनेमातून आम्ही एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 6 / 9दिव्या खोसला कुमार २००४ मध्ये दिल्लीवरुन मुंबईत आली. ती म्हणाली,' माझे आईवडील माझ्याबाबतीत कायमच प्रोटेक्टिव्ह होते. त्यांना नेहमी माझी काळजी असायची. पण मी मुंबईत सगळं स्वत:च करायचे आणि मला मजा यायची. लोकल मधून प्रवास करायचा, पोर्टफोलियो बनवायचा, ऑडिशन द्यायचे. 7 / 9तेव्हा मी पीजीमध्ये राहायचे. स्ट्रगल काळात अनेक पीजी बदलले. मला जे प्रोजेक्ट ऑफर व्हायचे त्यातून मी काहीच भूमिका निवडायचे. पण मला इतक्या वर्षात खूप कमी प्रोजेक्ट ऑफर झाले. पण जास्तीत जास्त संधी हव्या आहेत. यारिया २ नंतर मला संधी मिळतील अशी आशा आहे.8 / 9मी २००० पासून करिअरची सुरुवात केली. मला असं जाणवलं की लोकांना तुम्हाला तुमची ओळख बनवून द्यायचीच नाहीए. मी एखाद्या मोठ्या कंपनीसोबत आहे तर मला काय गरज असं त्यांना वाटतं. कमी संधींमध्येही बेस्ट निवडावं लागतं. 9 / 9दिव्या खोसला कुमारने 2005 साली टी सिरीजचे संचालक भूषण कुमारशी लग्नगाठ बांधली. आज ती ३५ वर्षांची आहे. मात्र तिने २३ वर्षांच्या कारकिर्दीत केवळ ७ सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यातही ३ च सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications