Join us

'माझ्या आईला सतत वेश्या अन् मोलकरणीचे...', ईला अरुण यांची मुलगी इशिताने व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 10:55 AM

1 / 8
चित्रपटसृष्टीत कलाकारांनी एखादी भूमिका केली की त्यांना सतत त्याच प्रकारच्या भूमिका ऑफर होतात. त्यामुळे नाईलाजाने कलाकार ते रोल नाकारतात. पण एखादी अभिनेत्रीने जर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची किंवा मोलकरणीची भूमिका केली असेल तर तिला सतत तेच रोल देणे कितपत योग्य आहे.
2 / 8
अभिनेत्री ईला अरुण (Ila Arun) यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. ईला अरुण म्हणजे मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. शिवाय त्या गायिकाही आहेत. त्यांचं राजस्थानी लोकसंगीत प्रसिद्ध आहे.
3 / 8
ईला अरुण यांची मुलगी इशिता अरुण (Ishita Arun) मात्र बॉलिवूडवर प्रचंड नाराज झाली आहे. माझ्या आईसोबत बॉलिवूडने अन्याय केला असल्याचं तिने म्हटलंय. आईने अभिनय केला पण काही प्रकारचे रोल तिला मिळालेच नाहीत. तिच्या या वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
4 / 8
इशिता अरुण एका मुलाखतीत म्हणाली,'माझ्या आईला तिचा हक्क मिळालेला नाही. तिच्या टॅलेंटचा पूर्ण उपयोग केला गेला नाही. आईला आता कुठे अशा भूमिका मिळत आहेत ज्यात ती स्वत:ला सिद्ध करु शकते.'
5 / 8
इशिता म्हणते, 'आई एक उत्तम लेखिका आहे. हिंदी आणि ऊर्दूवर तिची पकड आहे. आज मी इतकी चांगली हिंदी बोलते ते तिच्यामुळेच. तिच्या अभिनयाबद्दल बोलायचं तर तिच्या करिअरची सुरुवात श्याम बेनेगल यांच्यामुळे सुरु झाली. ते सर्वांचे आवडते कलाकार आहेत आणि मी नेहमीच गंमतीत म्हणते की माझ्या आईने नेहमी वेश्या, मोलकरणीच्याच भूमिका केल्या.'
6 / 8
इशिता पुढे म्हणते,'माझ्या आईला नेहमीच तिच्या दिसण्यावरुन जज केले गेले. यामुळेच तिला कमी भूमिका मिळाल्या. ओटीटी माध्यम हे आईसाठी एक वरदानच ठरलं असं म्हणायला हरकत नाही. कारण तिला चांगल्या भूमिका मिळायला लागल्या'
7 / 8
आई आज एकामागे एक चित्रपट करत आहे. फिल्म निर्मांत्यांना माझी विनंती आहे जोपर्यंत माझी आई अॅक्टिव्ह आहे तिला चांगले रोल द्या, काम द्या. तिच्या निधनानंतर स्मारक बनवू नका, असंही ती म्हणाली.
8 / 8
ईला अरुण यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हंसल मेहता यांच्या 'स्कूप' या वेबसिरीज मध्ये काम केले आहे. यामध्ये त्यांनी न्यूज पेपर एडिटरची भूमिका निभावली आहे.
टॅग्स :वेबसीरिजबॉलिवूडसिनेमा