वडिलांचा विरोध झुगारुन सावत्र भावाने बहिणीचं लग्न विवाहित हिरोशी लावलं, कोण आहे ही अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:47 IST
1 / 9मनोरंजनविश्वात अशा अनेक गोष्टी आहेत जे ऐकून सामान्यांना धक्काच बसतो. कधी कोणाचं लग्न होतं तर कधी तुटतं. कधी पॅचअप तर कधी ब्रेकअपही होतं.2 / 9अशीच एक अभिनेत्रीने आहे जिने वडिलांचा विरोध झुगारत एका विवाहित अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधली. यासाठी तिला चक्क सख्ख्या आणि सावत्र भावाने मदत केली होती.3 / 9ही अभिनेत्री जुही बब्बर(Juhi Babbar). जुही दिग्ग्ज अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) यांची लेक आहे. त्यांना आर्य (Arya) आणि प्रतीक (Prateik Babbar) ही मुलंही आहेत. आर्य आणि जुही सख्खे भाऊ बहीण असून प्रतीक त्यांचा सावत्र भाऊ आहे.4 / 9जुही बब्बरने २००३ साली 'काश आप हमारे होते' मध्ये भूमिका साकारली होती. यामध्ये गायक सोनू निगम मुख्य भूमिकेत होता. सिनेमा फ्लॉप झाला होता. 5 / 9२००७ मध्ये जुहीचं दिग्दर्शक बिजॉय नांबियारसोबत लग्न झालं. लग्नानंतर दोनच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.6 / 9जुहीने नंतर 'फराज','अय्यारी' सारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. २००९ मध्ये तिने 'घर की बात है' मालिकेत काम केलं. याच मालिकेदरम्यान ती अभिनेता अनुप सोनीच्या प्रेमात पडली. तेव्हा अनुप विवाहित होता.7 / 9जुही आणि अनुप यांचं घर जवळ जवळच होतं. त्यामुळे अनेकदा ते भेटायचे आणि प्रेमात पडले. अनुप पत्नी रितूला चीट करत जुहीला भेटायचा. परिणामी नंतर अनुप आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला. 8 / 9दुसरीकडे जुहीने अनुपबद्दल वडील राज बब्बर यांना सांगितले. मात्र ते या लग्नाच्या विरोधात होते. अशा वेळी प्रतीक आणि आर्य दोन्ही भावांनी बहिणीला तिचं प्रेम मिळवून दिलं.9 / 9जुही बब्बर आणि अनुप सोनी यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना एक १२ वर्षांचा मुलगाही आहे. जुहीने ही स्टोरी कपिल शर्मा शोमध्ये सांगितली होती.