Join us

'या' अभिनेत्रीने आदित्य चोप्राला सुचवलं DDLJ हे नाव, सिनेमात काम न करताच केली मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 1:08 PM

1 / 9
बॉलिवूडचा ऑल टाईम फेव्हरेट चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'(DDLJ) सिनेमाचे अनेक किस्से आहेत. कलाकारांनी अनेकदा मुलाखतीत शूटिंगदरम्यानचे किस्से सांगितले आहेत. मात्र 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हे नाव कोणी सुचवलं माहितीए का
2 / 9
आदित्य चोप्राने (Aditya Chopra) दिग्दर्शित केलेल्या या ब्लॉकबस्टर सिनेमाचे बजेट ४ कोटी इतके होते. तर चित्रपटाने देशात ८९ कोटींची कमाई केली होती. 1995 साली चित्रपट रिलीज झाला. इतक्या वर्षांनंतरही सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही.
3 / 9
आजही शाहरुख काजोलला एकत्र पाहिलं की या सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अमरिश पुरी यांची खलनायकी पण काळजी करणाऱ्या बापाची भूमिकाही जबरदस्त गाजली. तर मंदिरा बेदीनेही छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. अनुपम खेर यांनीही विनोदी भूमिकेतून धमाल आणली.
4 / 9
सिनेमाचं टायटल काय असावं याकडे हे कोणालाच सुचत नव्हतं. टायटलसाठी आदित्य चोप्राला बरंच डोकंफोड करावं लागलं. शेवटी एका अशा अभिनेत्रीने नाव सुचवलं ज्या अभिनेत्रीने सिनेमात कोणतीही भूमिका साकारली नाही.
5 / 9
ती अभिनेत्री म्हणजे किरण खेर (Kirron Kher). अनुपम खेर यांच्या पत्नी अभिनेत्री किरण खेर यांनी जेव्हा सिनेमाचं टायटल सुचवलं तेव्हा आदित्य चोप्राला ते लगेच आवडलं आणि त्याने तेच फायनल केलं.
6 / 9
आदित्य चोप्राने याचा उल्लेख यशराज फिल्म्सद्वारे पब्लिश झालेल्या 'आदित्य चोप्रा रिलीव्ह्ज...दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या पुस्तकात केलाआहे.
7 / 9
किरण खेर यांना ही कल्पना 1974 साली आलेल्या शशी कपूरच्या 'चोर मचाए शोर'मधील ले जाएंगे..दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हे गाणं ऐकून आली. आदित्यने जेव्हा ही कल्पना ऐकली तेव्हा त्यालाही ती आवडली.
8 / 9
आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे 'सिमरन' आणि 'राज' हे आयकॉनिक कॅरेक्टर करणारे काजोल आणि शाहरुख यांना सुरुवातीला सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. ही भूमिका खूपच कंटाळवाणी आहे अशी काजोलची प्रतिक्रिया होती तर शाहरुखनेही नकार दिला होता.
9 / 9
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा पहिलाच असा सिनेमा आहे ज्याचे मेकिंगही शूट केले गेले होते. तिथूनच 'बिहाइंड द सीन' बनवणे सुरु झाले.आदित्य चोप्राचा भाऊ उदय चोप्राने व्हिडिओग्राफर बनून बिहाईंड द सीन फुटेज रेकॉर्ड केले. नंतर याचा वापर सिनेमाच्या प्रमोशनसाठी केला गेला.
टॅग्स :आदित्य चोप्रा शाहरुख खानकाजोलसिनेमा