Join us

आई अन् आजीसोबत झाली अभिनेत्रीची तुलना, हिंदी इंडस्ट्रीत मिळालं नाही काम; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:47 PM

1 / 9
मुनमुन सेन सिनेसृष्टीतील सर्वात बोल्ड अँड ब्युटीफिल अभिनेत्री. बंगाली सिनेमांसोबतच त्यांनी हिंदीतही लोकप्रियता मिळवली. मूनमून सेन यांची आई सुचित्रा सेन या सुद्धा ६० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या.
2 / 9
मुनमुन सेन यांना दोन मुली आहेत. रायमा सेन (Raima Sen) आणि रिया सेन(Riya Sen). दोघींनी आईप्रमाणेच सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्यांना आजी आणि आईप्रमाणे लोकप्रियता मिळू शकली नाही.
3 / 9
सैफ आणि विद्या बालनच्या 'परिणीता' सिनेमात रायमा सेन दिसली होती. तिने विद्या बालनच्या बहिणीची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने 'चोकर बाली' ते आता ' द व्हॅक्सिन वॉर' सिनेमात काम केले आहे.
4 / 9
नुकतंच रायमाने एका वेबसाईटला मुलाखत दिली. यात तिने इंडस्ट्रीतील संघर्षाविषयी सांगितले. तसंच आई, आजीसोबत तुलना होते तेव्हा काय वाटतं याविषयीही ती बोलली.
5 / 9
रायमाला हिंदी इंडस्ट्रीत चांगल्या भूमिका ऑफर झाल्या नाहीत म्हणून सध्या ती बंगाली इंडस्ट्रीत सक्रीय आहे. यामुळेच ती हिंदी सिनेसृष्टीतून गायब झाली आहे.
6 / 9
ईटाइम्सशी बोलताना रायमा म्हणाली, 'माझ्या आजीच्या वेळी बॉलिवूडमध्ये चांगले सिनेमे बनत होते. माझ्यावेळी चित्रच बदललं. बंगाली फिल्म इंडस्ट्रीत मला खूप स्ट्राँग भूमिका मिळाल्या पण हिंदीत मी नेहमीच मागे राहिले.'
7 / 9
'पण आज मला आनंद होत आहे की हिंदी सिनेसृष्टी बदलत आहे. महिलांना सोडून प्रत्येक भूमिका चांगली ऑफर केली जात आहे. सहाय्यक कलाकारही चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या भूमिका खरंच स्ट्राँग आहेत.'
8 / 9
शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चांगल्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. लोक थिएटरमध्ये जाणं कधी बंद करतील असं मला वाटत नाही. लोकांना सिनेमे बघायला आवडतं आणि हिंदी सिनेमांचा कंटेंट खूप चांगला आहे.'
9 / 9
रायमाची बहीण रिया सेन नुकतीच 'कॉल मी बे' या अनन्या पांडेच्या सीरिजमध्ये थोड्यावेळासाठी दिसली. रियानेही हिंदी, साऊथ, बंगाली सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
टॅग्स :सेलिब्रिटीरिया सेनबॉलिवूड