लग्नानंतर ११ महिन्यातच 'या' अभिनेत्रीच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या, आता जगतेय एकाकी आयुष्य By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:30 AM1 / 9सत्तरच्या दशकातील बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री जिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने भल्याभल्यांना भुरळ घातली होती. तिला चित्रपटाच घेण्यासाठी दिग्दर्शकांमध्ये चढाओढ असायची. मात्र या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य कायमच वादातीत राहिलं. ती अभिनेत्री म्हणजे 'रेखा'(Rekha)2 / 9रेखा यांचा जन्म चेन्नई येथे झाला. रेखा यांचे वडिल जेमिनी गणेशन हे तामिळ चित्रपटसृष्टीतले एक दिग्गज होते. त्यांची तीन लग्न झाली. त्यांना पहिल्या पत्नीपासून चार, दुसऱ्या पत्नीपासून रेखा आणि राधा या दोन मुली, तिसऱ्या पत्नीपासून विजया चामुंडेश्वरी आणि मुलगा सतीश.3 / 9रेखा यांचं वडिलांशी फारसं पटलं नाही मात्र त्यांचं सर्व भावंडांशी चांगलं नातं आहे. रेखा यांनी वयाच्या १२ व्या वर्षी तेलुगू सिनेमा 'रंगुला रत्नम' या सिनेमात भूमिका केली. तर १९६९ मध्ये कन्नड सिनेमातून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली.4 / 9रेखा यांचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेचा विषय राहिलं आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा दोरदार रंगल्या होत्या. दोघांनी अनेक हिट सिनेमे दिले. रेखाने खुलेआम अमिताभ यांच्याप्रती प्रेम व्यक्त केले होते. मात्र अमिताभ यांनी नेहमीच शांत राहणे पसंत केले.5 / 9ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नात रेखा सिंदूर लावून आल्या होत्या. तेव्हाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. रेखा आणि अमिताभ यांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. 6 / 9अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा जया बच्चन पर्यंत पोहोचल्या होत्या. अशा परिस्थितीत जया यांनी रेखाला घरी जेवणाचे आमंत्रण दिले. तेव्हा अमिताभ शूटसाठी शहराबाहेर होते. रेखा आणि जया यांनी भरपूर गप्पा मारल्या मात्र यामध्ये कुठेच अमिताभ यांचा उल्लेखही केला नाही. यानंतर जाताना जया फक्त इतकंच म्हणाल्या,'मी अमितजींना कधीच सोडणार नाही.'7 / 9रेखा यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॅजेडी वेगळीच आहे. १९९० मध्ये त्यांनी लग्न करुन सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं होतं. दिल्लीचे व्यापारी मुकेश अग्रवाल यांच्यासोबत रेखाने लग्नगाठ बांधली. मात्र लग्नानंतर ११ महिन्यातच मुकेश अग्रवाल यांनी गळफास घेत आत्महत्या केली. रेखा पुन्हा एकदा एकटी पडली.8 / 9यानंतर २००८ मध्ये पुन्हा रेखा यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. एका अवॉर्ड सोहळ्यात त्या सिंदूर लावून आल्या. रेखा यांचं नाव अक्षरश: संजय दत्तसोबतही जोडलं गेलं आहे. 9 / 9या सर्व अफवांनंतरही रेखा मात्र आपल्या मर्जीनुसारच आयुष्य जगत आहेत. आणि आजही त्या कमालीच्या सुंदर आहेत. मात्र पतीच्या निधनानंतर त्या आजही एकट्याच आयुष्य जगत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications