लग्नानंतर ॲक्टिंगपासून दूर गेली अभिनेत्री, ४१ व्या वर्षी झाली आई; सासूसोबतचे रील्स होतात व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 2:48 PM1 / 9मनोरंजनसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. स्टार अभिनेत्यांसोबत त्यांचे चित्रपट रिलीज झाले. मात्र नंतर त्या अचानक स्क्रीनवरुन गायब झाल्या.2 / 9अशीच एक अभिनेत्री आहे जी आज वयाच्या 45 व्या वर्षीही एकदम ग्लॅमरस दिसते. इतकंच नाही तर तिने वयाच्या 41 व्या वर्षी मुलाला जन्म दिला. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. 3 / 9ही आहे अभिनेत्री समीरा रेड्डी(Sameera Reddy). 1998 साली आलेल्या पंकज उधास यांच्या 'आहिस्ता' या म्युझिक अल्बममध्ये ती दिसली. समीराने आपल्या १५ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिंदी, साऊथ सिनेमांमध्ये काम केलं. 4 / 9२००२ साली समीराने 'मैने दिल तुझको दिया' सिनेमातून पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमातून तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं. यानंतर ती 'मुसाफिर','नो एन्ट्री','वन टू थ्री','दे दना दन' सिनेमांमध्ये काम केलं. २०१२ साली तिचा 'चक्रव्यूह' हा शेवटचा सिनेमा होता.5 / 92014 साली अक्षय वर्दे या महाराष्ट्रीयन बिझनेसमनसोबत तिने लग्नगाठ बांधली. लग्नाआधी ती २ वर्ष त्याला डेट करत होती. 2015 साली तिने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव हंस असं ठेवण्यात आलं. तर 2019 साली तिला मुलगी झाली जिचं नाव नायरा आहे. 6 / 9समीराने वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म दिल्याने तिची खूप चर्चा झाली होती. कारण या वयात अनेक महिला आजकाल रिस्क न घेता सरोगसीचा मार्ग निवडतात.7 / 9प्रेग्नंसीनंतर समीराचं वजन खूप वाढलं होतं. तिने पोस्टपार्टम डिप्रेशनचा सामना केला. या काळात तिला अनेक अडचणी आल्या. वजनामुळे तिला ट्रोल केलं गेलं. यावर मात करत ती यातून बाहेर आली.8 / 9आज वयाच्या 45 व्या वर्षी समीरा आपल्या ग्लॅमरस लूकने पुन्हा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बिग बॉस 18 मध्ये समीरा सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. अद्याप अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. 9 / 9समीराच्या सासू मंजिरी वर्दे यादेखील लोकप्रिय आहेत. सासू सूनेचे रील्स नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications