Join us

'बोल्ड' अभिनेत्रीचा मिळाला टॅग, सयानी गुप्ता भडकली; म्हणाली, "लोकांच्या नजरा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:11 PM

1 / 7
अभिनेत्री सयानी गुप्ता (Sayani Gupta) म्हटलं की आपोआपच तिच्यासमोर बोल्ड अभिनेत्रीचा टॅग लागतो. कारण सयानीने आतापर्यंत अनेक प्रोजेक्ट्समध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत.
2 / 7
२०१९ साली आलेल्या 'फोर मोर शॉट्स प्लीज' या वेबसीरिजमध्ये तिने २० वर्ष मोठ्या मिलिंद सोमणसोबत इंटिमेट सीन्स दिले आहेत. तसंच प्रतीक बब्बरसोबतही तिचे किसींग सीन्स आहेत.
3 / 7
दरम्यान आता सयानीने या 'बोल्ड' टॅगवर संताप व्यक्त केला आहे. सयानी गुप्ता आगामी 'ख्वाबो का झमेला' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिने प्रतीक बब्बरसोबत स्क्रीन शेअर केली आहे.
4 / 7
'सिनेमाच्या प्रमोशनवेळी सयानी बोल्ड टॅगवर म्हणाली, 'मला बोल्ड अभिनेत्री हा टॅगच मिळाला आहे. त्यामुळे अनेक जण माझ्यासोबत काम करण्यासाठी एवढे सहज नसतात. दिग्दर्शक मला पाहून रुममधून बाहेर निघून जातात. मी एका महिलेसोबत काम केले जी स्वत: दिग्दर्शिका राहिली आहे.'
5 / 7
'मलाही बरेचदा बोल्ड सीन्स करताना अनकंफर्टेबल होतं. दिग्दर्शक इनसिक्युअर असतात आणि एकाच बाजूला झुकलेले असतात. काही वेळेस आम्ही बोल्ड सीन्स देत असतो तर तिकडे दिग्दर्शकांनाच ऑकवर्ड वाटतं. आम्हालाच त्यांना समजवावं लागतं की ठीक आहे काही हरकत नाही.'
6 / 7
'मी एका सिनेमात बोल्ड सीन्स दिले तर मला त्याच प्रकारच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या. मी बोल्ड सीन्स देते म्हणजे मी प्रत्येकच प्रोजेक्टमध्ये देईन असा त्याचा अर्थ होत नाही. मी माझ्या शरिरासोबत कंफर्टेबल आहे पण ते सीन्स जर योग्य हेतूसाठी असतील तर ते करायला हरकत नाही.'
7 / 7
'मी काही बोल्ड सीन्स पाहून सिनेमा स्वीकारत नाही तर ती कथेची गरज असेल तरच मी ते करते. प्रेक्षक म्हणून जर मी काही पाहत असेल तर मलाही उगाचच बोल्ड सीन्स पाहण्याची इच्छा नसते. त्यामुळे लोकांच्या नजरा कशा आहेत त्यावर सगळं अवलंबून आहे.'
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड