वयाच्या ६० व्या वर्षी प्रेमात पडली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, फिजिक्स प्रोफेसरसोबत थाटला संसार By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:08 PM1 / 9प्रेमात वय बघत नाहीत. ते आपोआप होतंच असं म्हणतात. असंच काहीसं झालंय अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये (Suhasini Mulye) यांच्यासोबत. वयाच्या ६० व्या वर्षी त्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी लग्न केलं. त्यांचं हे लग्न चर्चेचा विषय ठरलं होतं.2 / 9अनेक हिंदी सिनेमांतून सुहासिनी मुळ्ये आपल्या भेटीला आल्या आहेत. 'लगान', 'हुतुतू','दिल चाहता है' यासारख्या सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत. अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. अभिनयाव्यतिरिक्त त्या लेखिका आणि दिग्दर्शिकाही आहेत. 3 / 9सुहासिनी मुळ्ये यांना 'हुतुतू' सिनेमातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. 'लगान' सिनेमात त्यांनी आमिर खानच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचंही कौतुक झालं होतं. 4 / 9सुहासिनी मुळ्ये यांचं वैयक्तिक आयुष्य अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. आधी अनेक वर्ष त्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होत्या मात्र काही कारणाने त्यांचं नातं तुटलं. यानंतर त्या ६० व्या वर्षी प्रेमात पडल्या तेव्हा मात्र त्यांच्याबद्दल जोरदार चर्चा झाली.5 / 9फिजिक्सचे प्रोफेसर अतुल गुर्गु यांच्यासोबत त्यांनी ६० व्या वर्षी लग्नगाठ बांधली. यावरुन त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं.त्यांनी हे लग्न ४ वर्ष लपवून ठेवलं होतं. मात्र नंतर ते जगासमोरच आलंच. या ट्रोलिंगवर अभिनेत्रीने रोखठोक मत व्यक्त केलं होतं.6 / 9त्या म्हणाल्या, 'अचानक लग्न केल्याने इतक्या का चर्चा होत आहेत. माझं लग्न काही इतका मोठा विषय नाही की लोकांनी चर्चा करावी. जसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधीच वय बघितलं जात नाही तसंच लग्न करण्यासाठी तरी का बघता. आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी वयाची गरज नसते.7 / 9सुहासिनी आणि त्यांच्या पतीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. फेसबुकवर त्यांच्यात बोलणं व्हायचं, त्यांची मैत्री झाली. बोलताना त्यांच्या लक्षात आलं की आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. मग आधी त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि नंतर आर्य समाजाच्या पद्धतीने रितसर लग्न केलं. तेव्हा त्यांचं वय ६० होतं तर त्यांचे पती अतुल गुर्गु यांचं वय ६५ होतं.8 / 9जेव्हा दोघं लग्न करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी भटजींना सांगितलं की आम्ही लग्न झालेले दाम्पत्य आहोत. तेव्हा हे ऐकून भटजी हैराण झाले होते आणि त्यांनी दोघांना हाकलून लावलं होतं असा किस्सा सुहासिनी यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.9 / 9अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. नुकत्याच त्या नेटफ्लिक्सवरील 'फेम गेम' या सिरीजमध्ये दिसल्या. यामध्ये माधुरी दीक्षित, संजय कपूर यांची मुख्य भूमिका होती. आणखी वाचा Subscribe to Notifications