बॉलिवूड गाजवणारी साऊथ अभिनेत्री, १२० कोटींची नेटवर्थ; हिंदीतील 'साईड ॲक्टर'च्या प्रेमात पडली By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 3:20 PM1 / 10मनोरंजनसृष्टीत अशा अनेक जोड्या आहेत ज्यांना पाहून विश्वासच बसत नाही. हृतिक रोशन -सबा आजाद, सुझैन-अर्सलान गोनी या जोड्या तर अनेकदा चर्चेत असतात. 2 / 10अशीच एक अभिनेत्री जी साऊथमध्ये आघाडीवर आहे. तर आता बॉलिवूडमध्येही तिचा डंका आहे. तिने आपल्या सौंदर्यामुळे सर्वांनाच भुरळ घातली आहे. 3 / 10ही अभिनेत्री कोणा बड्या अभिनेत्याच्या नाही तर एका नवोदित उभरत्या कलाकाराच्या प्रेमात पडली आहे. ही मिसमॅच्ड जोडी असल्याचं अनेकदा बोललं जातं. कोण आहेत हे सेलिब्रिटी?4 / 10ही जोडी आहे तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि विजय वर्माची (Vijay Varma). तमन्ना विजय वर्माला डेट करत असल्याने अनेकदा चर्चेत असते. तमन्नाची निवड पाहून सगळेच शॉक झाले. सोशल मीडियावर ही जोडी मिसमॅच्ड म्हणूनही चर्चेत आली.5 / 10GQ च्या रिपोर्टनुसार, तमन्ना १२० कोटींची मालकीण आहे. एका सिनेमासाठी ती तब्बल ४ ते ५ कोटी रुपये घेते. 'बाहुबली २' या ब्लॉकबस्टर सिनेमात तिने काम केलं होतं. यासाठी तिला ५ कोटी रुपये मानधन मिळालं. 6 / 10यासोबतच तमन्ना एका जाहिरातीतून ७ ते ८ कोटी रुपये कमावते. तसंच ब्रँड एन्डॉर्समेंट्स मधून सोशल मीडियावर एक पोस्ट करुनही तिची बक्कळ कमाई होते. 7 / 10सध्या तमन्ना प्रोफेशनला नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. बॉलिवूड सिनेमांमध्ये कधी सहायक तर कधी मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विजय वर्मासोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. बरेचदा दोघंही हातात हात घालून कॅमेऱ्यासमोर येतात. 8 / 10तमन्नाचं नाव काही वर्षांपूर्वी विराट कोहलीसोबत जोडलं गेलं होतं. याशिवाय पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रजाकसोबतही तिच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मात्र तिने हे अफवा असल्याचं सांगितलं होतं. 9 / 10विजय वर्माची नेटवर्थ तमन्नापेक्षा सात पटींनी कमी आहे. २०२३ मध्ये विजयची नेटवर्थ १७ कोटी होती. रिपोर्टनुसार, विजय वर्मा एका सिनेमासाठी २५ ते ७५ लाख रुपये मानधन घेतो. 10 / 10विजय वर्मा 'पिंक' सिनेमातून चर्चेत आला. त्याने अद्याप सोलो हिट सिनेमा दिलेला नाही. मात्र त्याने केलेल्या साईड भूमिकांमधून त्याच्या अभिनयाची प्रचंड प्रशंसा होते. आणखी वाचा Subscribe to Notifications