Join us

"मला स्क्रीनवर श्रीदेवीची भूमिका साकारायची आहे", प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:56 IST

1 / 8
भारतीय सिनेमाच्या इतिसाहात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींचं नाव घ्यायचं तर श्रीदेवीचं (Sridevi) नाव आवर्जुन येतं. वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनय करणाऱ्या श्रीदेवी यांनी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले.
2 / 8
पुरुषप्रधान संस्कृतीतही श्रीदेवी यांनी महिलेच्या जीवावरही सिनेमा हिट होतो हे दाखवून दिलं होतं. तसंच त्यांना भाषेचाही अडथळा नव्हता. हिंदीसह तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी काम केलं.
3 / 8
१९६७ साली त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. तर १९७६ साली वयाच्या १३ व्या वर्षीच त्यांनी तमिळ सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.
4 / 8
१९७९ साली आलेला 'सोलवा सावन' हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा. नंतर त्यांनी 'चांदनी','मवाली','मिस्टर इंडिया','लाडला','जुदाई','सदमा' असे एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले.
5 / 8
श्रीदेवी यांना पहिल्या महिला सुपरस्टार असंही म्हटलं जातं. तब्बल ५० वर्ष त्यांनी इंडस्ट्रीत काम केलं. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सम्मानित करण्यात आलं.
6 / 8
अशा या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्रीचा २०१८ साली दुबईत अकस्मात मृत्यू झाला. श्रीदेवी कुटुंबासोबत दुबईत एका लग्नसोहळ्याला गेल्या होत्या. तिथे बाथटबमध्ये त्यांचा मृतदेह आढळला.
7 / 8
श्रीदेवी यांच्या बायोपिकची चर्चा अनेकदा होते. त्यांच्या भूमिकेसाठी बऱ्याच अभिनेत्रींचं नाव समोर आलं होतं. आता नुकतंच अभिनेत्री तमन्ना भाटियाने श्रीदेवी यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे
8 / 8
'श्रीदेवी यांची भूमिका पडद्यावर साकारण्याची माझी खूप इच्छा आहे. मला वाटतं त्या सुपरआयकॉनिक होत्या. मी कायमच त्यांची सर्वात मोठी चाहती राहिली आहे.'
टॅग्स :तमन्ना भाटियाश्रीदेवीबॉलिवूडआत्मचरित्र