In Pics: 77 वर्षांच्या झाल्यात तनुजा, आजही आहेत तितक्याच बिनधास्त By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 11:22 AM1 / 11आईकडूनच तनुजा यांना अभिनयाचा वारसा मिळाला. आईनेच तनुजा यांना लॉन्च केले. 1950 मध्ये बालकलाकार म्हणून फिल्मी करिअर सुरु केल्यानंतर 1960 मध्ये ‘छबीली’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.2 / 11तनुजा यांचा पहिला सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही. त्यांना खरे यश मिळाले ते 1961 मध्ये प्रदर्शित ‘हमारी याद आएगी’ या चित्रपटाद्वारे.3 / 11तनुजा त्यांच्या बिनधास्त अॅक्टिंगसाठी जशा ओळखल्या जात, तसाच त्यांचा स्वभावही बिनधास्त होता. सुरुवातीपासूनच प्रचंड चंचल आणि मौजमस्ती करणारी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाई. 4 / 11केवळ इतकेच नाही तर सेटवर त्या दाखवत असलेल्या नख-यांचीही त्याकाळी बरीच चर्चा होती. एकदा अशाच नख-यांमुळे तनुजा यांना दिग्दर्शकाने कानाखाली लावली होती. होय, ‘हमारी याद आएगी’ या चित्रपटाच्या सेटवरचा हा किस्सा. हा किस्सा त्याऐवळी अनेक मॅगझिनची हेडलाईन बनला होता. केदार शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. चित्रपटाच्या सेटवर तनुजांच्या नख-यांनी अख्खी टीम वैतागली होती. एकीकडे केदार शर्मा त्यांच्या तापट स्वभावासाठी ओळखले जात तर तनुजा बिनधास्त स्वभावासाठी.5 / 11केदार शर्मा यांच्यासमोरही तनुजा मस्तीच्या मूडमध्ये असत. कुठलेही काम गंभीरपणे घ्यायचेच नाही, असाच हा प्रकार होता. चित्रपटाच्या एका दृश्यात तनुजा यांना हिरोसमोर रडायचे होते. पण अनेकदा रि-टेक होऊनही तनुजा हे दृश्य देऊ शकल्या नाहीत. पण याचे दु:ख वाटण्याऐवजी त्या खिदळू लागल्या.6 / 11आधी केदार यांनी तनुजा यांना समजावून बघितले. पण समजण्याऐवजी, आज माझे रडण्याचे मूड नाही. हा सीन नंतर केव्हातरी शूट करू, अशा शब्दांत तिने केदार यांना सुनावले. तनुजा यांच्या तोंडचे हे वाक्य ऐकून केदार इतके संतापले की, मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्यांनी तनुजांच्या थोबाडीत मारली. अख्खी टीम हे पाहून स्तब्ध झाली.7 / 11 तनुजा यांचे बालपण खूप लाडात गेले. यामुळे त्या बिनधास्त होत्या 50 च्या दशकात त्यांना टॉम बॉय म्हणून ओळखले जाऊ लागले होते, ते याच बिनधास्त स्वभावामुळे.8 / 11आज 77 वर्षांच्या वयातही तनुजा तशाच बिनधास्त व बोल्ड आहेत. अलीकडे स्विमसूटमधील त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.9 / 111973 मध्ये तनुजा यांनी बंगाली दिग्दर्शक शोमू मुखर्जीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर काहीच वर्षांत दोघे वेगळे झालेत. पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही.10 / 11तनुजा मुलींसोबत अनेकदा मौजमस्ती करताना दिसतात. 11 / 11 त्या किती बिनधास्त आहेत, याची कल्पना या फोटोवरून तुम्हाला येईलच. आणखी वाचा Subscribe to Notifications