मी ड्रग्ज टेस्ट केली, तुम्हीही करा...! ‘हॉण्टेड 3 डी’ची अभिनेत्री टिया बाजपेयीने शेअर केला रिपोर्ट By रूपाली मुधोळकर | Published: September 25, 2020 12:42 PM1 / 10ड्रग्ज प्रकरणात अनेक बड्या सेलिब्रिटींची नावे समोर आल्यानंतर इंडस्ट्रीतील अनेकांचे धाबे दणाणले आहे. मात्र ‘कर नहीं तो डर नहीं,’ म्हणणारे बिनधास्त आहेत. ‘हॉण्टेड 3 डी’ या सिनेमाची अभिनेत्री टिया बाजपेयी यापैकीच एक.2 / 10‘कर नहीं तो डर नहीं म्हणत टियाने स्वत:ची ड्रग्ज टेस्ट केली. इतकेच नाही तर या टेस्टचा रिपोर्ट सोशल मीडियावर शेअर केला.3 / 10याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर करत, टियाने अन्य कलाकारांना खास संदेशदेखील दिला आहे.4 / 10सगळे सारखे नसतात. माझ्या कुठल्याही सहकलाकाराला ड्रग्जचा कलंक नको असेन तर त्यांनी ड्रग्ज टेस्ट करा आणि ही टेस्ट केल्यानंतर त्याच्या रिपोर्ट सर्वांसोबत शेअर करा, असे टियाने म्हटले आहे.5 / 10काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्री बदनाम होतेय. यामुळेच मी स्वत:ची ड्रग्ज टेस्ट केली. हो, मी टेस्ट केली आणितुम्ही बघू शकता की, माझी टेस्ट निगेटीव्ह आली. प्रत्येकाकडे एकाच दृष्टिकोनातून पाहू नका, ही विनंती मी यानिमित्ताने करतेय. इंडस्ट्रीतले आमच्यापैकी अनेकजण प्रामाणिकपणे कष्ट करत आहेत आणि या कष्ट व प्रतिभेच्या जोरावर इंडस्ट्रीत स्थान निर्माण करू पाहत आहेत, असेही टीयरने म्हटले आहे.6 / 10ड्रग्ज टेस्ट करा, रिपोर्ट जगाला सांगा. स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबासाठी, स्वत:च्या करिअरसाठी हे करा. तुमच्यावर जे चाहते प्रेम करतात, त्यांच्यासाठी तरी हे करा, अशी विनवणी सुद्धा तिने केली आहे.7 / 10टिया बाजपेयी ही अभिनेत्री असण्यासोबतच एक सिंगरही आहे.8 / 10विक्रम भट यांच्या ‘हॉण्टेड 3 डी’ या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.9 / 101920- इव्हिल रिटर्न्स, बांके की क्रेजी बारात, हेटस्टोरी 4 अशा सिनेमात ती दिसली आहे.10 / 102005 मध्ये सारेगामापा या रिअॅलिटी सिंगींग शोमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications