Join us  

'आधी रस्त्यावर नंतर कारमध्ये...', अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, 'त्याने पँटची...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 2:30 PM

1 / 6
दिल्ली ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी इथे मुलींना आजही सुरक्षित वाटत नाही. निर्भया केसमुळे तर दिल्ली हादरुन निघाली होती. अनेक मुलींना या शहरात वाईट अनुभव आला आहे.एका अभिनेत्रीनेही मुलाखतीत तिला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला.
2 / 6
हिंदी फिल्म इंडस्ट्रीतली प्रतिभावान अभिनेत्री तिलोत्तमा शोम (Tillotama Shome). 'लस्ट स्टोरीज 2','सर' आणि आता नुकताच आलेला 'त्रिभुवन मिश्रा CA टॉपर' या सिनेमांमध्ये तिच्या भूमिकेचं कौतुक झालं आहे. याशिवाय ती 'दिल्ली क्राइम' या गाजलेल्या वेबसीरिजमध्येही होती.
3 / 6
'हार्टफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत तिलोत्तमा शोमने दिल्लीतला भयानक अनुभव सांगितला. ती म्हणाली, 'मी एकदा बसची वाट पाहत थांबले होते आणि अंधार व्हायला लागला होता. तेव्हाच ६ मुलं कारमधून उतरले आणि माझ्याजवळ येऊन थांबले. मी सुरुवातीला थोडी घाबरले आणि तिथून बाजूला सरकले. मात्र ते लोकांनी माझी छेड काढायला सुरुवात केली.'
4 / 6
त्यातल्या एकाने तर मला दगडही मारला. तेव्हा मी तिथून पळ काढला. पण ते कारमध्ये असल्याने सहज मला गाठू शकणार होते. म्हणून मी रस्त्याच्या मधोमध उभी राहिले आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना लिफ्ट मागत होते. बऱ्याच गाड्या न थांबताच पुढे जात होत्या.
5 / 6
तेवढ्यात मला एक कार दिसली ज्यावर मेडिकलचं प्लस साइन होतं. ते बघून ही कार डॉक्टरांची असेल आणि सुरक्षित असावी असं मला वाटलं. ती कार थांबली आणि मी समोरच्या सीटवर बसले. पण इथे तर वेगळाच अनुभव आला. ड्रायव्हरने त्याच्या पँटची झिप उघडली आणि बळजबरी त्याने माझा हात पकडला.
6 / 6
मी त्याला जोरात धक्का दिला. यामुळे त्याने कार थांबवली. तो मला बाहेर जा म्हणाला. तो भयानक प्रसंग मी कधीच विसरु शकणार नाही. दिल्ली ही मुलींसाठी नाही असंही ती यावेळी म्हणाली.
टॅग्स :सेलिब्रिटीदिल्लीलैंगिक छळबॉलिवूड