Join us

१६ व्या वर्षी पदार्पण, धर्माचं कारण देत १९ व्या वर्षीच घेतला अभिनयातून संन्यास; कोण आहे ही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 12:48 IST

1 / 7
फिल्म इंडस्ट्रीत कधी कोणाचं काय ठरेल सांगता येत नाही. कधी कोणाला प्रचंड यश मिळतं तर कधी कोणी अचानक इंडस्ट्रीतून गायब होतं.
2 / 7
अशीच एक अभिनेत्री जिने 'दंगल' सिनेमातून बॉलि़वूडमध्ये पदार्पण केलं. तिने गीता फोगाटच्या लहानपणीची भूमिका साकारली. ती अभिनेत्री म्हणजे जायरा वसीम (Zaira Wasim).
3 / 7
जायरा वसीमचा जन्म २३ ऑक्टोबर २००० रोजी झाला. ती काश्मिरी मुस्लिम परिवारातून येते. वयाच्या १६ व्या वर्षी तिने 'दंगल' सिनेमात भूमिका साकारली. १७ व्या वर्षी तिचा 'सीक्रेट सुपरस्टार रिलीज झाला. तर १९ व्या वर्षी तिने 'द स्काय इज पिंक' मध्ये काम केलं.
4 / 7
जायराचे हे तीनही सिनेमे गाजले. तिचं खूप कौतुकही झालं. मात्र अचानक २०१९ मध्ये जायराने सिनेइंडस्ट्रीतून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. १६ व्या वर्षी पदार्पण, तीन हिट सिनेमे आणि १९ वर्षी तिने अभिनयातून थेट संन्यास जाहीर केला.
5 / 7
मी माझ्या कामावरुन खूश नाही. माझं काम मला माझ्या इस्लाम धर्पापासून दूर नेत आहे असं कारण सांगत तिने अभिनयाला रामराम केला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली. तिच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.
6 / 7
काही महिन्यांपूर्वीच जायराच्या वडिलांचं निधन झालं. ते बँकेत काम करायचे. तर तिची आई शिक्षिका आहे. जायराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली आणि सर्वांना प्रार्थना करायचं आवाहन केलं.
7 / 7
जायरा सोशल मीडियावर सक्रीय असते पण अनेक वर्षांपासून तिने तिचा चेहराही दाखवलेला नाही. आता ती २४ वर्षांची आहे.
टॅग्स :झायरा वसीमबॉलिवूडइस्लाम