Join us

Adil Khan : "मला सुशांत सिंह राजपूत व्हायचं नाही"; आदिलने राखी सावंतच्या आरोपावर सोडलं मौन, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 2:22 PM

1 / 14
ड्रामा क्वीन राखी सावंतने नुकताच पती आदिल खानला मीडियासमोर इशारा दिला होता. आदिलवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता आणि मीडियालाही त्यांनी आदिलला सपोर्ट करू नये आणि त्याची मुलाखत घेऊ नये असे सांगितले होते. मात्र आदिल खान दुर्रानी यांने आता यावर भाष्य केलं आहे.
2 / 14
राखीने केलेल्या आरोपावर आणि या संपूर्ण प्रकरणावर आदिल खानने आपले मौन सोडले आहे. शनिवारी त्याने इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली आहे. राखीबद्दलच्या प्रत्येक गोष्टीला त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीद्वारे उत्तर दिले आहे.
3 / 14
आदिल खानने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, 'जर मी त्या महिलेबद्दल परत बोलत नाही तर याचा अर्थ असा नाही की मी चुकीचा आहे. कारण मी माझ्या धर्माचा आदर करतो आणि स्त्रीचा आदर करायला शिकवले आहे, म्हणून मी गप्प आहे.'
4 / 14
त्याने पुढे लिहिले की, 'ज्या दिवशी मी तोंड उघडून लोकांना खरं सांगेन की ती माझ्यासोबत काय करत आहे आणि मी काय करत आहे, तेव्हा ती काहीही बोलू शकणार नाही. याच कारणामुळे ती रोज मीडियासमोर येते आणि लोकांना सांगते की आदिल खूप वाईट आहे.'
5 / 14
फ्रीजमध्ये जाण्याच्या मुद्द्यावरही आदिलने लिहिले की, 'मी असेही म्हणू शकतो की मला सुशांत सिंग राजपूत बनायचे नाही.' आदिलने पुढे लिहिले की, 'माझ्यासारख्या समंजस मुलगा... जो नेहमी तिच्या पाठीशी उभा राहिला, चांगली लाईफस्टाईल दिली.'
6 / 14
'तो एक रुपया घेऊन मुंबईला आला होता हे सर्वांना सांगणे सोपे आहे. तुमच्या प्लॅनला सलाम पण तो प्लॅन फारसा स्मार्ट नव्हता.' आदिल पुढे लिहितो की, 'राखीने मीडियाला आदिलला कव्हर न करण्यास सांगितले जेणेकरुन मी सत्य सांगू नये, राखीने मला सांगितले होते की मला हिरो तसेच झिरो कसा बनवायचा हे माहीत आहे.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
7 / 14
राखी सावंतने नुकतीच आपली आई गमावली आहे. त्यानंतर आता तिने आपला नवरा आदील खान दुर्रानीवर गंभीर आरोप केले आहेत. राखीने पुन्हा एकदा मीडियासमोर आपल्या मनातील राग व्यक्त केला. राखीचं वैवाहिक जीवन चांगलं चाललेलं नाही, उलट पती आदिल खान दुर्रानी तिला वापर करत असल्याचं तिने म्हटलं आहे.
8 / 14
आदिलचे कोणत्या तरी मुलीसोबत अफेअर सुरू आहे आणि याच कारणामुळे तो सर्वांसमोर लग्नाची बाब मान्य करत नव्हता. राखीने आदिलवर गंभीर आरोप करत तिला श्रद्धा वालकरप्रमाणे फ्रीजमध्ये जायचे नसल्याचं सांगितलं आहे. राखीने अलीकडेच आदिल दुर्रानीसोबतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
9 / 14
राखीचे लग्न योग्य मार्गावर जात असल्याचे मानले जात होते. पण आईच्या निधनानंतर राखीने आदिलच्या प्रेयसीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. पापाराझीशी बोलताना राखी सावंत म्हणाली, 'तुम्हा लोकांच्या माध्यमातून मी त्या मुलीला सावध करू इच्छिते की जेव्हा मी बिग बॉस मराठी 4 मध्ये होते तेव्हा तिने या संधीचा फायदा घेतला.'
10 / 14
'मी तिचे नाव सांगणार नाही पण वेळ आल्यावर फोटो आणि व्हिडीओ दाखवेन. आदिलने त्याच्या अफेअरमुळे हे 8 महिने लपवून ठेवले. तो म्हणतो, तू माझी देव आहेस, खुदा, अल्लाह के बाद तूच आहेस.. नाही माझी तुलना खुदासोबत करू नकोस.. मला पत्नी, मुलांची आई व्हायचे आहे.'
11 / 14
'मला माणूस व्हायचे आहे. मला हे सगळं सांगायचं नव्हतं, आत्तापर्यंत गप्प राहिले. त्या मुलीमुळे आदिल खानने लग्नास नकार दिला. त्यानंतर मीडिया-फॅन्स आणि जगाच्या भीतीने लग्नाचा स्वीकार केलं. मला कोणाची शिडी व्हायचे नाही. मला शिडी बनवू नका' असं राखीने म्हटलं आहे.
12 / 14
'मी इतर मुलींप्रमाणे गप्प बसणार नाही, आदिलला सोडले नाही तर व्हिडीओ फोटो व्हायरल करेन. आदिल, त्या मुलीला सोडून दे.' याच दरम्यान राखी सावंतला तिच्या जीवाची भीती वाटत आहे. दिल्लीतील आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर प्रकरणाचं तिने उदाहरण दिलं आहे.
13 / 14
'मीडियासमोर कशाला येते, घरीच राहा असं म्हणतात. पण घरी राहून मला फ्रीजमध्ये जायचे नाही. मी एक विवाहित महिला आहे आणि माझ्या हक्कांसाठी लढणार आहे. आदिल त्या मुलीला सपोर्ट करत आहे, त्यामुळेच तो मला सोडून तिच्याशी लग्न करेल' असंही राखीने म्हटलं आहे.
14 / 14
लग्नाच्या वेळी रजिस्टरची कागदपत्रे आणि फोटो शेअर केले होते आणि आदिलसोबत लग्न झाले आहे, पण तो सर्वांसमोर स्वीकारण्यास नकार देत असल्याचेही सांगितले होते. हे प्रकरण चर्चेत आले आणि राखीने सांगितले की, सलमान खानने आदिलशी बोलून लग्न स्वीकारले. यानंतर दोघांचे आनंदात असलेले फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
टॅग्स :राखी सावंत