Join us

राम असो किंवा रावण, आदिपुरुषच्या ६०० कोटींच्या बजेटवर भारी पडतायेत AI अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 9:58 AM

1 / 8
सध्या 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमाची जोरदार चर्चा आहे. रामायणावर आधारित या सिनेमाला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. ना कोणाला कलाकारांचा लुक आवडला आणि ना सिनेमातील व्हीएफएक्स. सोशल मीडियावर सिनेमाबाबत अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.
2 / 8
त्यातच आता AI चा ट्रेंड सुरु आहे. सेलिब्रिटींचे AI इमेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आदिपुरुषच्या कॅरेक्टर्सचेही AI इमेज आता व्हायरल होत आहेत. आदिपुरुषच्या व्हीएफएक्सपेक्षा त्यांचे AI इमेजच जास्त पसंत केले जात आहेत.
3 / 8
रावणाचं कॅरेक्टर करणाऱ्या अभिनेता सैफ अली खानची AI इमेज आता व्हायरल झाली आहे. AI चा वापर करुन एकाने सैफला रावणाचा लुक दिला आहे. हा ती AI इमेज पाहून लोक आकर्षित झालेत. व्हीएफएक्सपेक्षा हीच इमेज चांगली दिसत असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. सिनेमात सैफची दाढी, आधुनिक हेअरस्टाईल आणि आकर्षक कवचवर प्रेक्षकांनी टीका केली आहे.
4 / 8
प्रभू श्रीरामाची भूमिका प्रभासने साकारायला नको होती असं अनेकांचं म्हणणं आहे. तो या भूमिकेत अजिबातच शोभून दिसलेला नाही अशी प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिली. प्रभासची राम अवतारातील AI इमेज पाहून नेटकरी प्रभावित झालेत.
5 / 8
AI कलाकाराने सीतेची भूमिका साकारणाऱ्या क्रिती सेननचीही इमेज बनवली आहे.क्रिती सेननच्या चेहऱ्याला सीता मातेचे रुप देत खूपच सुंदर पद्धतीने दर्शवलं आहे. ही इमेज बघून नेटकऱ्यांनी AI चं कौतुक केलंय.
6 / 8
सिनेमात लक्ष्मणची भूमिका सनी सिंहने निभावली आहे.मात्र तो आपलं पात्र साकारण्यात सपशेल आपटला आहे. त्याची भूमिका अजिबातच लक्षात राहण्यासारखी नव्हती असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. सनीचा जर AI अवतार आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सिनेमातील लक्ष्मणापेक्षा सनीची ही AI इमेजच जास्त पसंत केली जातेय.
7 / 8
आदिपुरुषमध्ये भगवान हनुमानाच्या डायलॉग्सवरुन चांगलंच वातावरण तापलं. मराठी अभिनेता देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे. मात्र देवदत्त हनुमानाची भूमिका साकारण्यात अपयशी ठरला असंच म्हणावं लागेल. त्याचा AI अवतारही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
8 / 8
आदिपुरुषमध्ये दाखवलेल्या रावणाच्या १० तोंडांच्या व्हीएफएक्सची तर खिल्लीच उडवली गेली. ६०० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाला साधं हे व्हीएफएक्सही नीट दाखवता आलं नाही असं म्हणत ट्रोल केलं गेलं. ओम राऊतच्या त्या व्हीएफएक्सपेक्षा १० तोंडी रावणाची ही AI इमेजच चांगली दिसत आहे.
टॅग्स :आदिपुरूषप्रभाससैफ अली खान क्रिती सनॉन