Adipurush Movie: 'आदिपुरुष'मधील सैफ अलीच्या लूकवरुन नवा वाद, हिंदू महासभेने केली खिलजी-औरंगजेबाशी तुलना By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 7:40 PM1 / 6 Adipurush Movie: प्रभास आणि सैफ अली खानचा बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून वादात अडकला आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसलेल्या VFXवरुन सोशल मीडिया यूजर्सनी चित्रपटाला वाईट पद्धतीने ट्रोल करायला सुरुवात केली आहे. नेटीझन्स चित्रपटातील VFX आणि सैफच्या पात्रावरुन निर्मात्यांना धारेवर धरत आहेत. 2 / 6 'आदिपुरुष' लाइव्ह अॅक्शनऐवजी चक्क अॅनिमेटेड दिसत असल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे. याशिवाय सैफ अली खानचा रावण अवतारही पसंत केला जात नाहीय. अखिल भारत हिंदू महासभा/संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनीही सैफच्या लूकचा निषेध केला आहे. ते म्हणाले, 'आदिपुरुषमध्ये दाखवण्यात आलेला सैफ अली खान लंकापती रावणाऐवजी अतिरेकी खिलजी किंवा चंगेज खान किंवा औरंगजेबसारखा दिसत आहे. हिंदू संस्कृती आणि पौराणिक पात्रांशी छेडछाड सहन होत नाही.'3 / 6 याशिवाय भाजपच्या प्रवक्त्या मालविका यांनीही आदिपुरुषवर टीका केली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली, 'वाल्मिकीचा रावण, इतिहासातील रावण, लंकाधिपती, 64 कलांमध्ये पारंगत असलेला महाशिवभक्त. आपल्या सिंहासनात 9 ग्रह बसवले होते. थायलंडचे लोक रामायणावर किती सुंदर नृत्य करतात. मग हे कार्टून बनवायची काय गरज होती? हे खरच तैमूरचे वडील आहेत. बॉलीवूडचे लोक किती मूर्ख आहेत. थोडेही संशोधन करू शकत नाही,' अशी पोस्ट त्यांनी केली.4 / 6 आदिपुरुषच्या टीझरमध्ये सैफ अली खानचा लूक पूर्णपणे विचित्र दिसत आहे. रावणाच्या अवतारात सैफचे केस लहान आहेत. त्याने काळ्या रंगाचा पोशाख घातला आहे आणि तो खूपच भयानक दिसतोय. पुष्पक विमानाऐवजी सैफ वटवाघुळ सारख्या प्राण्यावर उडताना दाखवला आहे. त्याचा हा लूक सोशल मीडिया यूजर्सना अजिबात आवडलेला नाही. ट्विटरवर त्याच्या लूकची खिल्ली उडवली जात आहे.5 / 6 सोशल मीडिया यूजर्सनी सैफ अली खानच्या रावण अवताराची खिलजीशी तुलना केली आहे. दिग्दर्शक ओम राऊतच्या चित्रपटातील रावण मूळ रामायणातील रावणापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे. तसेच, टीझरमध्ये दाखवलेली लंकाही लोकांना आवडलेली नाही. चित्रपटातील व्हीएफएक्स एखाद्या कार्टूनसारखे दिसत आहे. 6 / 6 दिग्दर्शक ओम राऊतचा हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत, सनी सिंह निज्जर लक्ष्मणच्या भूमिकेत, सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications