Join us

Adipurush Teaser:'आदिपुरूष'च्या टीजरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, VFX पाहून म्हणे- यापेक्षा कार्टून बरं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 4:55 PM

1 / 6
प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चाहते खूप दिवसांपासून या टीझरची वाट पाहत होते. मात्र टीझर आल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडलं आहे . याचे कारण म्हणजे चित्रपटाचे VFX. आदिपुरुषच्या टीझरमध्ये, प्रभास, प्रभू रामच्या भूमिकेत दिसतोय. तर क्रिती सेनॉन (Kriti Senon) सीतेच्या भूमिकेत दिसतेय. त्यांच्यासोबत वानरसेनाही आहे. ही सर्व दृश्ये एखाद्या अ‍ॅनिमेशन चित्रपटातील वाटत असली तरी लाइव्ह अ‍ॅक्शन फिल्मची नाही.
2 / 6
VFX पाहताच युजर्सनी टीझरला ट्रोल करायला सुरुवात केली. दिग्दर्शक ओम राऊत यांनी ही चूक लवकर दुरुस्त करावी, असे यूजर्सचे म्हणणे आहे. अनेक युजर्सनी या टीझरच्या व्हीएफएक्सची खिल्ली उडवली असून याला टेम्पल रन गेम म्हटले आहे.
3 / 6
कार्टून नेटवर्क आणि पोगो सारख्या कार्टून चॅनेल्स या चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क विकत घेतील आणि लोकांना ते या चॅनेल्सवर बघायला मिळतील अशीही काहींनी खिल्ली उडवली. 'आदिपुरुष' संदर्भात #disappointed, #cartoon आणि #adipurushteaser सारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.
4 / 6
एका युजरने लिहिले की, दिग्दर्शकाने मूळ कथेप्रमाणे वानर सेनेला अर्धे मानव आणि अर्धे माकड बनवायला हवे होते. सैफ अली खानचा फॉर्म आणि प्रभासचं ट्रान्सफॉर्मेशन देखील नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटलेलं नाही.
5 / 6
दिग्दर्शक ओम राऊत यांनी रामायणातील पौराणिक कथेवर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बनवला आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची कल्पना त्याला जपानी अॅनिमेटेड फिल्म रामायण पाहिल्यानंतर सुचली.
6 / 6
चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. VFX च्या कामावर 250 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. या चित्रपटात प्रभास प्रभू रामांची, क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत आहे. सैफ अली खान, रावण आणि सनी सिंह निज्जर लक्ष्मणच्या भूमिकेत आहेत. आदिपुरुष 12 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.
टॅग्स :आदिपुरूषप्रभासक्रिती सनॉनसैफ अली खान