IN PICS : 30 सिनेमे नाकारले, मग अक्षय कुमारसोबत केला धमाका, निमरत कौरचा फिल्मी प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 8:00 AM1 / 9लंचबॉक्स, एअरलिफ्ट या सिनेमाद्वारे आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री निरमत कौर हिचा आज वाढदिवस आहे. तेव्हा जाणून घ्या तिच्याबद्दल काही खास गोष्टी...2 / 913 मार्च 1982 रोजी राजस्थानच्या पिलानी येथे निरमतचा जन्म झाला होता. 3 / 9निरमतचे वडील मेजर भूपिंदर सिंह हे लष्करात होते. त्यामुळे त्यांची सतत बदली व्हायची. साहजिकच निमरतचे बालपण वेगवेगळ्या शहरात गेले. अरुणाचल, पटियाला, बठिंडा या शहरांत ती खूप काळ राहिली.4 / 9केवळ आवड म्हणून थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘ऑल अबाऊट वुमन’ या एका नाटकात निमरतने 25 ते 85 वयाच्या महिलेच्या भूमिका साकारल्या होत्या.5 / 9 मात्र नंतर तिने अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत येऊन तिने अनेक ऑडीशन्स दिल्या.6 / 9सोनीच्या ‘तेरा मेरा प्यार’ या अल्बममध्ये निरमतने काम केले होते. हा अल्बम हिट ठरला आणि निमरतचा चेहरा प्रकाशझोतात आला.7 / 9असे म्हणतात की, निमरतने पहिल्या सिनेमासाठी 27-28 सिनेमे रिजेक्ट केले होते. तिचा पहिला सिनेमा ‘पेडलर्स’ होता.8 / 9यानंतर ती इरफान खानसोबत ‘लंचबॉक्स’मध्ये दिसली. यानंतर अक्षय कुमारच्या ‘एअरलिफ्ट’ सिनेमात तिचा दमदार अभिनय पाहायला मिळाला.9 / 9निमरतच्या वडिलांचे हिज्बुल मुजाहिदच्या अतिरेक्यांनी अपहरण केले होते. यातच ते शहीद झाले. त्यांना मरणोत्तर शौर्यचक्राने गौरविण्यात आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications