लोकप्रिय अभिनेत्री माझ्यासोबत काम करत नव्हत्या, तारा सिंगने सांगितली होती बॉलिवूडची दुसरी बाजू By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 9:45 AM1 / 10 बॉलिवूड अभिनेता सनी देओल आज 66 वर्षांचा झाला आहे. 1983 मध्ये त्यांचा 'बेताब' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि 2023 मध्ये 'गदर-2' रिलीज झालेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. 2 / 10'गदर 2' नंतर सनीचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत ज्यात 'लाहोर 1947' आणि 'बॉर्डर 2', 'अपने 2' यांचा समावेश आहे. गदर २ साठी २० कोटींच मानधन घेणाऱ्या तारा सिंगने 'बॉर्डर 2'साठी 50 कोटी रुपये फी घेतल्याचं बोललं जातंय. इतकंच नाही तर तो निर्मात्यांसोबत प्रॉफिट शेअरिंगदेखील घेणार आहे.3 / 10सनी ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेता होता. त्याने 100 हून अधिक चित्रपट केले आहे. पण एकवेळ अशी होती जेव्हा सनी देओलसोबत बॉलिवूड मधील मोठ्या अभिनेत्री काम करायला तयार नव्हत्या.4 / 10गेली पाच दशकं देओल कुटुंब बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतं आहे. अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलने ८०च्या दशकात बॉलिवूडमध्ये एंट्री केली.5 / 10अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. पण म्हणावा तसा सन्मान आणि मान सनी देओला इंडस्ट्री मिळालं नाही.6 / 10एका मीडिया शोमध्ये दरम्यान बोलताना सनीने सांगितले होते की, मला स्वत:च ब्रँडिंग कसे करावे हे माहित नाही. त्यामुळे इतर कलाकार त्याच्या पुढे जायचे.7 / 10पुढे सनी देओल म्हणाला होता, की इंडस्ट्रीत अनेक मोठ्या अभिनेत्री आहेत ज्या त्याच्यासोबत काम करण्यास टाळाटाळ करायच्या. श्रीदेवी आणि ऐश्वर्या राय यांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिल्याचे सनीने सांगितले होते.8 / 10अभिनेत्याने खुलासा केला की, 'जेव्हा 'घायल' चित्रपट बनत होता, तेव्हा मी यासाठी श्रीदेवींशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी चित्रपट करण्यास नकार दिला होता. यानंतर मी दुसरा चित्रपट करत असताना मी ऐश्वर्या रायला त्यासाठी विचारले पण तिनेही नकार दिला.9 / 10सनी देओलचा 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट पहिल्यांदा काजोलला ऑफर झाला होता. अभिनेत्रीने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता आणि नंतर ही भूमिका अमिषा पटेलकडे गेली.10 / 10 'गदर 2' च्या पत्रकार परिषदे दरम्यान सनी देओलने इंडस्ट्रीतील अभिनेत्रींवर ताशेरे ओढले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications