Join us

'शिवशक्ती' नाव अन् आकर्षक स्ट्रक्चर, अजय देवगण-काजोलच्या आलिशान बंगल्याचे Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 2:14 PM

1 / 7
अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol) बॉलिवूडमधलं लाडकं कपल. दोघंही त्यांच्या लॅव्हिश लाईफस्टाईलमुळेही चर्चेत असतात. महागड्या कार, आलिशान बंगला असं त्यांचं आयुष्य आहे.
2 / 7
देवगण कुटुंब मुंबईतील जुहू मध्ये राहतात. त्यांच्या बंगल्याचं नाव 'शिवशक्ती' आहे. अजय देवगण 'शिवभक्त' असल्याचं तर सगळ्यांनाच माहित आहे.
3 / 7
घरात एन्ट्री केल्यावर स्पायरल पायऱ्या लक्ष वेधून घेतात. या लॅव्हिश वुडन स्टेयरकेस च्या बॅकड्रॉपला ओवल शेप बल्ब लटकत आहेत. ज्यात पाण्याच्या थेंबांचं इल्यूजन आहे.
4 / 7
घराची बाल्कनी सुद्धा स्पेशियस आहे. अनेकदा काजोल या ठिकाणाहून आपले फोटो शेअर करत असते.
5 / 7
घरात फोटोजेनिक कॉर्नरही आहेत. सोलो फोटोसाठी ही प्लेस अगदी खास आहे. बाजूला सुंदर फ्लॉवर पॉट आणि आकर्षक वॉलजवळ हे ठिकाण आहे.
6 / 7
लिव्हिंग रुमही खूप आकर्षक आहे. चोहोबाजूंनी काचा आणि आतमध्ये एलईडी लाईट्स आहेत. या लक्झरी लिव्हिंग रुममध्ये ते फॅमिली टाईम घालवत आहेत.
7 / 7
तसंच किचनसमोरील डायनिंग एरियाही सुंदर आहे. वुडन वॉल्स आहेत आणि मोठा डायनिंग टेबल ठेवण्यात आला आहे.
टॅग्स :अजय देवगणकाजोलमुंबईसुंदर गृहनियोजन