Join us

कॉलेज ग्रृपचा 'गुंड' ते पडद्यावरील हिरो; साधा भोळा दिसणाऱ्या अजय देवगणबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 12:45 PM

1 / 9
अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावलं. अभिनयाबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील त्याने काम केलं.
2 / 9
'फूल और कांटे' चित्रपटापासून सुरुवात करणाऱ्या अजयने चित्रपटसृष्टीत तीन दशकांहून अधिक काळ घालवला आहे. अजय देवगणचे वडील वीरू देवगण हिरो बनण्यासाठी मुंबईत आले, पण ते स्वतः हिरो बनू शकले नाहीत.
3 / 9
त्यामुळे आपला मुलगा मोठा झाल्यावर त्याला हिरो बनवायचं, असं त्यांनी ठरवलं आणि अजयचाही कल हा नेहमीच फिल्म लाइनकडे होता. अजय देवगणने पडद्यावर सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
4 / 9
रोमँटिक आणि ॲक्शन चित्रपटांचा नायक म्हणून रुपेरी पडद्यावर सुरुवात करणाऱ्या अजय देवगणने विनोदी भूमिकांमध्येही आपली ताकद दाखवली आहे. या अष्टपैलू अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे.
5 / 9
अजय देवगण आज ५५ वर्षांचा झाला आहे. साधा आणि शांत दिसणारा अजय देवगण कॉलेजच्या दिवसात खूप मस्तीखोर होता. कॉलेजमध्ये गुंडगिरी करायचो, असा खुलासा खुद्द अजयनेच एका मुलाखतीत केला होता.
6 / 9
अजय देवगणचे खरे नाव हे विशाल देवगण आहे. कॉलेजमधल्या मित्रांमध्ये तीन टोळ्या खूप प्रसिद्ध होत्या. दारा सिंहचा मुलगा विंदूची 'विंदू गँग', बॉबी देओलची 'बॉबी गँग' आणि अजय देवगणची 'विशाल गँग'. तिघेही कॉलेजच्या दिवसात चांगले मित्र होते आणि कॉलेज संपल्यानंतरही त्यांची मैत्री कायम राहिली.
7 / 9
अजय देवगणने एकदा खुलासा केला होता की तो कॉलेजमध्ये गुंड होता. एकदा झालं असं होतं की, होळीचा माहौल होता आणि अजय हा मित्रांसोबत वांद्रेला गेला होता. बिअर पिऊन सर्वजण परत येताना त्यांच्यासमोर पोलिसांची जीप उभी राहिली, पोलिस त्यांच्याकडेच पाहत होते.
8 / 9
जीपमध्ये हॉकीचे साहित्य आणि तलवार होती. हे पाहून पोलिसांना त्याच्यावर संशय आला. अजय हा फाईट मास्टर वीरू देवगणचा मुलगा आणि विंदू हा दारा सिंहचा मुलगा असल्याचे कळल्यावर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं.
9 / 9
अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'सिंघम 3', 'मैदान' आणि 'दृश्यम 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टॅग्स :अजय देवगणबॉबी देओलबॉलिवूड