Join us  

एक नाही, दोन नाही तर तब्बल चार सिनेमातून अजय देवगण येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 1:45 PM

1 / 10
अ‍ॅक्शनपटांसोबतच कॅामेडी चित्रपटांमध्येही ठसा उमटवणाऱ्या अभिनेता अजय देवगणचे (Ajay Devgn) यंदा तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यापैकी आर. माधवन आणि ज्योतिकासोबतच्या 'शैतान'ने २११ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. खूप अपेक्षा असलेल्या 'मैदान' आणि 'औरों में कहां दम था' या चित्रपटांनी चाहत्यांना निराश केलं.
2 / 10
आगामी काळात अजयचे चार सिक्वेल्स रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॅाक्स ऑफिसवर अजयचे 'सिक्वेल'राज पाहायला मिळेल.
3 / 10
अजयच्या चाहत्यांना सर्वांत जास्त आतुरता ती म्हणजे 'सिंघम अगेन' (Singham Again) सिनेमाची. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न्स'मध्ये रसिकांना भावलेली अजयची सिंघम स्टाईल पुन्हा दिसणार आहे.
4 / 10
यात अजयसोबत करीना कपूर, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॅाफ, अर्जुन कपूर, जॅकी श्रॅाफ, दयानंद शेट्टी अशी तगडी स्टारकास्ट आहे. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये धमाका करणार आहे.
5 / 10
अजयचा दुसरा चित्रपट आहे 'रेड २' (RAID 2). या चित्रपटाद्वारे इन्कम टॅक्स ऑफिसर अमय पटनाईक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज कुमार गुप्तांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट २०१८मध्ये रिलीज झालेल्या 'रेड' या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
6 / 10
'रेड'ने बाॅक्स ऑफिसवर १५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. 'रेड २'मध्ये रितेश देशमुख, वाणी कपूर, सौरभ शुक्ला, गायत्री अय्यर, रजत कपूर हे कलाकार आहेत.
7 / 10
अजयचा आणखी एक सिक्वेल म्हणजे 'दे दे प्यार दे २' (De De Pyaar De 2). हा २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दे दे प्यार दे' चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. यातील तब्बू-अजय आणि रकुल प्रीत सिंग-अजय या दोन्ही जोड्यांच्या केमिस्ट्रीची जादू रसिकांनी अनुभवली होती.
8 / 10
पहिल्या भागाचे दिग्दर्शन अकीव अलीने केलं होतं. तर सिक्वेलचं दिग्दर्शन अंशुल शर्मा करत आहेत. यात अजयसोबत रकुल, आर. माधवन आणि शरीक खान आहेत.
9 / 10
अजयचा आणखी एक चित्रपट येत आहे तो म्हणजे 'सन ऑफ सरदार २' (Son of Sardaar 2) . अश्विनी धीर यांनी दिग्दर्शित केलेला 'सन ऑफ सरदार' (Son of Sardaar)२०१२मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जवळपास १६१ कोटी रुपयांचा बिझनेस केला.
10 / 10
या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी अजय पुन्हा जसविंदर सिंग रंधावा म्हणजेच जस्सी बनला आहे. विजय कुमार अरोरा यांनी दिग्दर्शित केलेल्या या कॅामेडी चित्रपटात अजयच्या जोडीला मृणाल ठाकूर आणि संजय दत्त हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
टॅग्स :अजय देवगणसिनेमाबॉलिवूडमृणाल ठाकूर