ट्विंकल खन्ना नाही तर 'या' अभिनेत्रीसह लग्न करणार होता अक्षय कुमार, एका कारणामुळे दोघांमध्ये आला दुरावा By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 3:22 PM1 / 10 रिल लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये अक्षय कुमारचं नाव अनेक अभिनेत्रींशीही जोडलं गेलं. यांत अभिनेत्री रवीना टंडनचंही नाव होतं. अक्षय कुमार आणि रवीना टंडन या जोडीनं एकाहून एक सरस सिनेमा दिलेत. 2 / 10अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या मोहरा सिनेमाला प्रदर्शित होऊन 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक राजीव राय यांचा हा सिनेमा 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात सुनील शेट्टी, परेश रावल, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. 3 / 10'मोहरा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.या सिनेमाने अक्षय-रवीनाच्या कारकिर्दीला नवीन उंची गाठली. हा सिनेमा होता ज्यादरम्यान शूटिंगदरम्यान अक्षय-रवीना यांच्यात जवळीक वाढत गेली होती. इतकेच नाही तर अक्षय आणि रवीना दोघेही लग्न करणार असल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. पण लग्न होण्यापूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले.4 / 10अक्षय आणि रविना एकेकाळी आकंठ प्रेमात बुडाले होते. दोघेही एकमेकांच्या कधी प्रेमात पडले हे त्यांचे त्यांनाच कळाले नाही.रिपोर्ट्सनुसार अक्षय आणि रविनाचे प्रेम 90 च्या दशकात 'मोहरा' सिनेमाच्या सेटवरच सुरू झाले होते.1994 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा दोघांच्या अफेअरच्याच जास्त चर्चा रंगल्या होत्या.5 / 10ऑनस्क्रीन तसेच दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चर्चेत होती. दोघांची प्रेमकथा अगदी परिपूर्ण असायची. प्रत्येकजण दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात होते. अक्षयची रवीनाने लग्नानंतर काम करु नये अशी ईच्छा होती. तिने गृहिणीच बनून रहावे त्यामुळे रवीनानेही सिनेमा साइन करणे बंद केले होते.6 / 10रवीनाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की अक्षय कुमारने तिला सांगितले होते की, तिचा शेवटच्या सिनेमाचे शूट पूर्ण होताच अक्षय तिच्याशी लग्न करेल. तसेच दोघांनी एका मंदिरात गुपचूप साखरपुडाही केला होता. या दोघांच्या नात्याची बातमी बाहेर येऊ द्यायची नव्हती. 7 / 10अक्षयच्या फिल्मी करिअरवर फरक पडले अशी त्याला भीती होती. काही काळ दोघांमध्ये सगळे सुरळीत सुरु होते. १९९६ मध्ये अचानक सगळ्या गोष्टी बदलल्या. १९९६ मध्ये खिलाडीयों का खिलाडी सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा दोघांच्या नात्याच अडचणी निर्माण झाल्या.8 / 10 अक्षय आणि रेखाच्या लिंक अपच्या बातम्यांनी रवीनाला त्रासदायक ठरु लागल्या. अक्षयच्या रेखासह अक्षयची वाढती जवळीक पाहून रवीनाला मोठा धक्का बसला होता. आता काडीमात्र भरोसा नसल्याचे सांगत रवीनाने अक्षयच्या आयुष्यातून रवीनाने निघून जाणेच पसंत केले.9 / 10रवीनाने मीडियामध्ये अक्षयविरोधात काही मुलाखतीही दिल्या होत्या.प्रेमात असताना विश्वास ही सर्वात मोठी गोष्ट असते.अक्षयने तिचा विश्वासघात केल्याचा आरोप तिने केला होता. रवीनासोबत नात्यात असनाता अक्षयचे बाहेर आणखी दोन अफेअर सुरु असल्याचेही बोलले गेले.10 / 10अक्षयने रवीनाची माफी मागितली पण रविनाने त्याला माफ केले नाही. अशा प्रकारे ही प्रेमकथेला कायमचा पूर्णविराम लागला. काही काळानंतर रवीनाने सगळं काही विसरत सिनेमाचे फायनान्सर अनिल थडानी आणि अक्षयने ट्विंकल खन्नाशी लग्न केले. आणखी वाचा Subscribe to Notifications