IN PICS : ‘लक्ष्मी बॉम्ब’ एकटा नाही, प्रदर्शनाआधी या सिनेमांवरूनही खूप झाला राडा By रूपाली मुधोळकर | Published: October 22, 2020 8:00 AM1 / 11अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ येत्या 9 तारखेला प्रदर्शित होतोय. पण त्याआधी हा सिनेमा एक ना अनेक वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या टायटलला हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर अक्कीच्या या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. खरे तर सिनेमे आणि वाद यांचे जुने नाते आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा वादात सापडलेला पहिला सिनेमा नाही. याआधीही अनेक सिनेमांवरून असाच राडा झाला आहे.2 / 11कबीर सिंग - अलीकडे शाहिद कपूरचा कबीर सिंग हा सिनेमा असाच वादात सापडला होता. अनेकांनी हा सिनेमा महिलाविरोधी असल्याचा आक्षेप घेत, अनेकांनी याविरोधात आवाज उठवला होता. इतकेच नाही तर वैद्यकीय क्षेत्राची बदनामी करणारा सिनेमा म्हणूनही यावर टीकेची झोड उठली होती. या वादापश्चात शाहिदच्या या सिनेमाने दमदार कमाई केली होती. पहिल्याच दिवशी या सिनेमाला 20.21 कोटींचे ओपनिंग मिळाले होते.3 / 11भारत - सलमान खानचा ‘भारत’ हा अलीकडचा वादात सापडलेला सिनेमा. प्रदर्शनाच्या चारदिवस आधी या सिनेमाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सिनेमातील सिनेमाच्या नावावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. या सिनेमाचे नाव भारतीय संविधानाच्या कलम 3 चे उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले होते. याऊपरही सलमानचा हा सिनेमा याच नावाने प्रदर्शित झाला आणि सिनेमाने बक्कळ गल्लाही जमवला.4 / 11दबंग 3 - या सिनेमाच्या टायटल ट्रॅकवरून वादाला तोंड फुटले होते. हुड हुड दबंग या गाण्यात सलमानच्या मागे साधु-संत गिटार घेऊन नाचताना दाखवण्यात आले होते. यावर आक्षेप नोंदवण्यात आला होता.5 / 11पानीपत - ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड झाल्याचा आरोप करत या सिनेमाला विरोध सहन करावा लागला होता.6 / 11पद्मावत - संजय लीला भन्साळीच्या या सिनेमावरून इतका राडा झाला की, अखेर या सिनेमाचे नाव बदलावे लागले होते. जाळपोळ, धमक्या अशा अनेक गोष्टींचा या सिनेमाला सामना करावा लागला. अगदी सिनेमाची लीड हिरोईन दीपिका पादुकोण हिला नाक कापण्याची धमकीही देण्यात आली. यानंतर काही राज्यात या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली. ‘पद्मावती’ हे सिनेमाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले तेव्हा कुठे हा वाद निवळला होता. या वादानंतरही या सिनेमाने बक्कळ कमाई केली होती. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 18 कोटींचा बिझनेस केला होता. एकूण कमाईचा अकाडा 585 कोटींच्या घरात होता.7 / 11गोलियों की रासलीला : रामलीला - भन्साळींचा हा सिनेमाही टायटलमुळेच वादात अडकला होता. अखेर सिनेमाचे नाव बदलून गोलियों की रासलीला : रामलीला असे ठेवावे लागले होते. या सिनेमाने पहिल्या दिवशी 12.80 कोटींचा बिझनेस केला होता आणि 356 कोटींची एकूण कमाई केली होती.8 / 11ऐ दिल है मुश्किल - हा सिनेमा पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्यावरून वादात सापडला होता. चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता असल्याच्या कारणावरून अनेकांनी या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती. याऊपर सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता.9 / 11केदारनाथ - दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या या सिनेमाला विश्व हिंदू परिषदेने जोरदार विरोध केला होता. चित्रपटात हिंदू -मुस्लिम हिरो-हिरोईनमध्ये दाखवण्यात आलेल्या किसींग सीनवरून वाद पेटला होता. या सिनेमाच्या टायटललाही विरोध झाला होता. यापश्चात सिनेमाने शानदार कमाई केली.10 / 11पीके - आमिर खानचा पीके हा सिनेमा 2014 साली रिलीज झाला होता. या सिनेमात हिंदू देव-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करत हिंदू संघटनांनी याविरोधात गोंधळ घातला होता. याऊपरही हा सिनेमा रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी सिनेमाने 26.63 कोटींची कमाई केली.11 / 11ओ माय गॉड - ओ माय गॉड चित्रपट प्रचंड वादात सापडला होता. हिंदू धर्माचा अनादर केल्याच्या आरोपामुळे या सिनेमामुळे मोठा वाद उफाळला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications