Akshay Kumar Tax : अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कर देणारा स्टार, एका सिनेमासाठी किती फी घेतो माहितीये? By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 5:40 PM1 / 8अक्षय कुमार पुन्हा एकदा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतला सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे. अक्षयला आयकर विभागाकडून सन्मानपत्र मिळालं आहे.2 / 8 सर्वाधिक कर देणाऱ्या कलाकारांच्या यादीत गेल्या पाच वर्षांपासून अक्षय कुमार अव्वल आहे. यंदाही त्याने सर्वाधिक कर भरला आहे.3 / 8यावर्षी अक्षयने किती भरला, हे माहित नाही. पण आयकर विभागाने त्याला सन्मानपत्र दिलं असून अक्षय सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रिटी असल्याचं म्हटलं आहे.4 / 82018 साली अक्षय कुमार सातव्या क्रमांकाच सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला होता. फोर्ब्स मॅगझिनच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील कलाकारांच्या यादीत तो 7 व्या क्रमांकावर होता.5 / 8अक्षय एका चित्रपटासाठी कोट्यवधी रूपयांचं मानधन घेतो. अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या सिनेमासाठी अक्षयने 60 कोटी फी घेतल्याची चर्चा आहे.6 / 8एका जाहिरातीसाठी तो 8 ते 10 कोटी रूपये वसूल करतो. टॅक्सचं म्हणाल तर, 2017 साली त्याने 29.5 कोटींचा टॅक्स भरला होता. त्यावर्षीचा तो सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रिटी होता.7 / 82014-15 साली देखील अक्षय सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला होता. आजघडीला अक्षय बॉलिवूडचा सर्वाधिक बिझी स्टार आहे. साहजिकच तो सर्वाधिक कर भरणारा अॅक्टर ठरला असेल तर त्यात नवल नाही.8 / 8अक्षयच्या झोळीत आत्ताही 7 सिनेमे आहेत. रक्षाबंधन, रामसेतू, कठपुतली, सेल्फी, ओएमजी 2, कॅप्सूल गिल आणि Soorarai Pottru या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये तो झळकणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications